Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 01:10 PM2024-12-12T13:10:27+5:302024-12-12T13:12:12+5:30

शरद पवार हे देशातील मोठे नेते असून त्यांच्याबाबत असे बोलणे योग्य नाही, यापुढील काळात त्यांच्याविषयी बोलताना सामंजस्याने समजून घेऊन बोलावे

It is inappropriate for gopichand padalkar sadabhau khot to criticize sharad pawar at a low level - Dilip Valse Patil | Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

पुणे : मारकडवाडीतील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करत असताना अपशब्द वापरले. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते पडळकर यांचा निषेध करत आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीसुद्धा गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी खालच्या पातळीवर टीका केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

वळसे-पाटील म्हणाले, दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी खालच्या पातळीवर टीका केली. ती अयोग्य आहे. राजकारणात एक सुसंस्कृतपणा असतो. शरद पवार हे देशातील मोठे नेते असून त्यांच्याबाबत असे बोलणे योग्य नाही. यापुढील काळात त्यांच्याविषयी बोलताना सामंजस्याने समजून घेऊन बोलावे. असेही ते म्हणाले. प्रकृतीमुळे मंत्रिपदासाठी मी नकार दिला अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझी प्रकृती ठणठणीत आहे. पक्ष व मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती समर्थपणे स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे 

नेमकं काय म्हणाले पडळकर 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा झाली होती. त्यावेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असं पडळकर म्हणाले.

Web Title: It is inappropriate for gopichand padalkar sadabhau khot to criticize sharad pawar at a low level - Dilip Valse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.