Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:47 PM2024-07-29T16:47:29+5:302024-07-29T16:48:28+5:30

महाराष्ट्रात खालपासून वरपर्यंत कोणालाही आता कायद्याची भीती राहिली नाही

It is not good for Maharashtra to win votes by castes Raj Thackeray | Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

पुणे: महाराष्ट्रात कोणालाही आता कायद्याची भीती राहिली नाहीये. पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला. त्यात दोन गेलेल्या मुलांची चर्चा कोणीही करत नाही. त्यांच्या आईवडिलांचं काय झालं? यावरही कोणी बोलत नाही. बातम्या फक्त मुलाच्या येतात. आता तर पोलिसांवर हात उगारनापर्यंत लोकांची मजल गेलीये. मग तेव्हा कायदा कुठं जातोय? खालपासून वरपर्यंत सगळ्यांची यातून सुटका होत नाही. तोपर्यंत अशा घटना घडत राहणार. सद्यस्थितीत घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे. जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जात आहेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितले आहे.  

पुण्यात पूरग्रस्त भागात राज ठाकरेंनी काल पाहणी केली. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ठाकरे म्हणाले, मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. प्रशासनाचे नियोजन दिसून येत नाही. किती गाड्या येतात, किती विद्यार्थी येतात ते राहणार कुठं? त्यांच्या गाड्या कुठं ठेवणार? हजार लोकांसाठी योजना कराव्या लागतात, हे सर्व टाऊन प्लॅनिंग मध्ये येत. आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु आहे. हे थांबत नाहीये, पुणे हे एक शहर नाही, पाच पाच शहर झाली.  कुठपर्यंत शहर पसरतंय याकडे लक्ष नाही. याला अजून एक कारण आहे. ते म्हणजे गेली २, ३ वर्ष महापालिका निवडणूक घेत नाही. नगरसेवक नाहीत, मग जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी. मग यामध्ये हा सगळं प्रशासकीय कारभार सुरु असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे. राज्यामधली लोक भिका मागतात आणि बाहेरचे येऊन राहतात याला काही सरकार चालवणं म्हणतात का? बाहेरची या राज्यात येतात ती महाराष्ट्राची होतात. मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातल्या लोक येऊन फ्लॅट, घर घेऊन जातात. स्वतः मुंबईतले आता वाऱ्यावर पडले आहेत. 

...तर पुणे शहराचे सगळे प्रश्न सुटतील  

तुम्ही लोकांशी बोलून प्रकल्प का आणत नाही? पत्रकारांशी का बोलत नाही? मी महापालिकेत जाऊन एक प्रेझेंटेशन दिल होत. तिकडं नागरिक आले होते. त्यात काही लपवाछपवी नव्हती. नदीकाठ प्रकल्प असो सगळं लोकांना दाखवा. हेवेदेवे बाजूला सारून राजकीय पक्षांनी एकत्र बसावं मग शहराचे सगळे प्रश्न सुटत जातील. आपण जे बोलतो ना ते रॉकेट सायन्स नाहिये, सहज शक्य होणारी गोष्ट आहे. मुळापासून काम केलं तर व्यवस्थित होईल. जगात अशी अनेक शहरे आहेत ज्याच्या बाजूने नदी जाते. पोलला दिवे लावत बसण्यापेक्षा या गोष्टीत लक्ष घालावं. 

Web Title: It is not good for Maharashtra to win votes by castes Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.