Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार

By श्रीकिशन काळे | Published: July 12, 2024 06:38 PM2024-07-12T18:38:18+5:302024-07-12T18:39:03+5:30

पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आलाय

It is predicted that light to moderate rains will fall in Pune by July 14 | Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार

Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे पुणेकर चिंतेमध्ये हाेते. पण आता वरूणराजाची कृपा झाली असून, सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पावसाळी वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. हवामान विभागानूसार यंदा चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

पण जून महिन्यापासून आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. परिणामी पुणेकरांमध्ये चिंता लागून राहिली आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला नाही. पण आता शुक्रवारपासून (दि.१२) पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आला आहे.

पुण्यातील आजचा पाऊस

लवासा : ५१.५ मिमी
लोणावळा : ३५.५ मिमी 
माळिण : ११ मिमी 
तळेगाव : ९.५ मिमी 
पाषाण : ७.३ मिमी
राजगुरूनगर : ७ मिमी 
शिवाजीनगर : ५.७ मिमी
खेड : ५.५ मिमी
वडगावशेरी : ५.५ मिमी 
एनडीए : ५ मिमी
दापोडी : ३ मिमी
चिंचवड : १.५ मिमी
ढमढेरे : १.५ मिमी
हडपसर : १ मिमी
बालेवाडी : १ मिमी 
कोरेगाव पार्क : ०.५ मिमी 

Web Title: It is predicted that light to moderate rains will fall in Pune by July 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.