लसीकरण केंद्र मी आणले यापेक्षा पुणेकरांचा जीव वाचविणे महत्वाचे : चेतन तुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:55+5:302021-04-30T04:14:55+5:30

पुणे : लसीकरण केंद्र अथवा कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जी मागणी मांडायची आहे, ती सांमजस्याने मांडली पाहिजे़ त्यासाठी ...

It is more important to save the lives of the people of Pune than the vaccination center I brought: Chetan Tupe | लसीकरण केंद्र मी आणले यापेक्षा पुणेकरांचा जीव वाचविणे महत्वाचे : चेतन तुपे

लसीकरण केंद्र मी आणले यापेक्षा पुणेकरांचा जीव वाचविणे महत्वाचे : चेतन तुपे

Next

पुणे : लसीकरण केंद्र अथवा कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जी मागणी मांडायची आहे, ती सांमजस्याने मांडली पाहिजे़ त्यासाठी आकांडतांडव करण्याची गरज नाही़ सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केले़

शहरातील लसीकरण व अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत तुपे यांनी प्रमुख पदाधिकाºयांसह महापालिका आयुक्त यांची भेट घेतली़ त्यायावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी महापौर वैषाली बनकर, प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे आदी उपस्थित होते़

महापालिकेने लसीकरण केंद्रांवर केवळ दुसरा डोसच दिला जाणार असून, पहिला डोस दिला जाणार नाही असे जाहीर केले आहे़ मात्र हे धोरण घातक असून,कोरोनाच्या तिसºया लाटेला टाळण्यासाठी शहरात अधिकाधिक लसीकरण करणे जरूरी आहे़ महापालिकेनेही स्वत:ही लस खरेदी करावी अशी मागणी आम्ही केली आहे़ या लस खरेदीसाठी पक्षाचे ४२ नगरसेवक स यादीतील प्रत्येकी १० लाख रूपये देण्यास तयार आहेत़ तसेच आम्ही दोन आमदारही याकरिता आमदार निधीतून पैसे देऊ असेही तुपे यांनी सांगितले़

सध्या शहरातील १८२ लसीकरण केंद्रांवर लसीचे वाटप असमान होत आहे़ तर १८२ केंद्रांपैकी एखाद्या भागात जवळ-जवळ ४ केंदे्र तर इतर ठिकाणी एकही नाही अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे शहरातील लोकसंख्येनुसार केंद्राची रचना करावी अशी मागणी आम्ही केली़ त्यास आयुक्तांनी होकार दिला असून, १२ हजार लोकसंख्येला एक लसीकरण केेंद्र अशी व्यवस्था करून लसीकरण केंद्रांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले आहे़ दरम्यान फिरत्या लसीकरण केंद्रांची सुरूवात करावी अशी मागणी आम्ही केली असून, याकरिता प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अन्य सुविधा आम्ही पक्षाच्यावतीने देऊ असेही तुपे यांनी सांगितले़

-----------------

Web Title: It is more important to save the lives of the people of Pune than the vaccination center I brought: Chetan Tupe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.