अापल्या मनातून प्लास्टिक जाणे अावश्यक : नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:56 PM2018-07-03T14:56:20+5:302018-07-03T14:57:55+5:30

पुणे महानगर परिषदेच्या वतीने 'प्लास्टिकबंदी आणि कारवाई' विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अापले मते नाेंदवली.

It is necessary to go plastic from our heart : Neelam gorhe | अापल्या मनातून प्लास्टिक जाणे अावश्यक : नीलम गोऱ्हे

अापल्या मनातून प्लास्टिक जाणे अावश्यक : नीलम गोऱ्हे

पुणे : ' शाश्वत विकासासाठी उपाययोजनांकडे जग एकवटत असताना प्लास्टिकबंदी महत्वाचे पाऊल आहे.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सर्व आरोपांना उत्तरे दिलेली आहेत. अनेक बाबतीत बंदी मधून सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अापल्या मनातून प्लास्टिक जाणे गरजेचे अाहे, असे मत शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी व्यक्त केले. 


    पुणे महानगर परिषदेच्या वतीने 'प्लास्टिकबंदी आणि कारवाई' विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. या महाचर्चेमध्ये आमदार विजय काळे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अॅड. असीम सरोदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, प्रदुषण नियामक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त सुरेश जगताप,स्टेशनरी -कटलरी असोसिएशनचे  दिलीप कुंभोजकर, हॉटेल असोसिएशनचे  जवाहर चोरगे, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे गोपाळ राठी, रिटेल व्यापारी असोसिएशनचे सचिन निवंगुणे सहभागी झाले होते. 

    आमदार विजय काळे म्हणाले, ' नागरिकांचा विरोध प्लास्टिक ला नाही, तर कारवाईच्या पद्धतीला आहे. आपल्याला प्लास्टिकबंदीची सवय लाऊन घेतली पाहिजे, कारण आपल्याला प्लास्टिकचे व्यसन लागले आहे. गोपाळ राठी म्हणाले, ' प्लास्टिक ने कागद, लाकडाला पर्याय दिला. वाहतुकीला , वापराला सुलभ असल्याने प्लास्टिक वापर वाढला. मात्र, कचरा व्यवस्थापन नीट न झाल्याने प्लास्टिक ही समस्या वाटते. आम्ही प्लास्टिक वर प्रक्रिया करायला तयार आहेत. ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले, ' प्लास्टिक हा महाराक्षस आहे. प्लास्टिक वर प्रक्रिया प्रकल्प करणे आवश्यक होते. प्लास्टिक बंदी चांगला निर्णय होता, मात्र, त्यावर पुनर्विचार सुरु झाल्याने निर्णयाचे वाटोळे झाले. वेफर्सवाल्या मोठया कंपन्यांना का  मोकळे सोडले ? त्यांचे अर्थकारण मोठे असते म्हणून का ? पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या का वगळल्या ? दंडवसुलीमुळे  कार्यकर्त्यांची सोय करण्याचीही सोय योजना होती. 

    अॅड. असीम सरोदे म्हणाले, ' पर्यावरणाच्या बाबतीत आपण निर्दयी वागलेलो आहोत.पर्यावरणाची नासधूस करून कोणीही व्यवसाय करू नये. प्लास्टिकबंदी गरजेची आहे.बंदी शिवाय पर्याय शोधला जाणार नाही. सचिन निवंगुणे म्हणाले, ' कापडी पिशवी हा फक्त कॅरीबॅग ला पर्याय आहे. बाकी कुठेही तो पर्याय उपयुक्त नाही. प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई का होत नाही. अन्न औषध प्रशासनाचे कोणतेही मत या बंदीसंदर्भात घेतले गेले नाही. इतर मान्यवरांनी सुद्धा या चर्चेत अापले मत मांडले. 

Web Title: It is necessary to go plastic from our heart : Neelam gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.