शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशनच - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:13+5:302021-06-06T04:09:13+5:30
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शनिवारी (दि. ५) पुणे दौऱ्यावर आहे. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शनिवारी (दि. ५) पुणे दौऱ्यावर आहे. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे वसंतदादा पाटील नाहीत. पण कोणी किती वैयक्तिक बोलावं, याचा विचार करायला हवा. शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्या होत नाहीत. आगामी काळात होणारी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी काही तरी नक्की असणार आहोत.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत. तसेच, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एक काही तरी नक्की असणार आहोत, असा आत्मविश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, राज्यात अनलॅाक होतोय ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पायरीवर निर्बंध कमी कसे करायचे, याची आखणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडतोय ही चांगली गोष्ट आहे. महाविकास आघडी सरकारमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. पण कोणा कोणात थोडा उत्साह असतो अशा शब्दांत राऊत यांनी विजय वड्डेटीवार यांच्या निर्बंध शिथिल करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयावर मिश्कील टिपण्णी केली.
पुणे: अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही. समोरून वार करतो असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहे. या वेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतानाच विविध राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले. राऊत म्हणाले की, अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे आम्ही त्यावेळीही सांगितले होते आणि आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, समोरून वार करतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार केला.याचवेळी त्यांनी माझं नातं शिवसेनेशी आहे. सत्ता असली किंवा नसली तरी आमचं नातं सेनेशीच आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत, असेही राहुल यांनी या वेळी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला: देवेंद्र फडणवीस
अजित पवार यांच्या सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर एका वेबिनारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता.त्यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत झालेल्या शपथविधीमुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला. मात्र त्यावेळी आमच्या मनात राग होता. त्यातून आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. असेही फडणवीस म्हणाले होते. पण राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता.