रेल्वे पार्सलद्वारे बॉम्ब, शस्त्रास्त्रे पाठवणे शक्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:37+5:302021-07-09T04:08:37+5:30

‘रामभरोसे’ कारभार : पार्सलमधून येते काय, जाते काय? प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून रोज ...

Is it possible to send bombs and weapons by train parcels? | रेल्वे पार्सलद्वारे बॉम्ब, शस्त्रास्त्रे पाठवणे शक्य?

रेल्वे पार्सलद्वारे बॉम्ब, शस्त्रास्त्रे पाठवणे शक्य?

Next

‘रामभरोसे’ कारभार : पार्सलमधून येते काय, जाते काय?

प्रसाद कानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून रोज जवळपास ८० टन माल पार्सल सेवेद्वारे देशाच्या विविध शहरात रेल्वेने जातो. मात्र धक्कादायक बाब अशी की चोवीस तास चालू असणाऱ्या या पार्सल ऑफिसमध्ये सामान बुक करताना त्याची कोणतीही तपासणी होत नाही. बिहारमधील दरभंगा स्थानकावरील पार्सल ऑफिसजवळ बॉम्बस्फोटाची घटना ताजी असताना पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल सुरक्षेची पाहणी ‘लोकमत’ने केली. यावेळी पुणे रेल्वे प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नसल्याचे आढळून आले.

तीन आठवड्यांपूर्वीच महिन्यांत सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेसच्या ब्रेक - एसएलआर (पार्सल डबा)मधून बॉम्ब ठेवलेली एक बाटली पार्सलद्वारे पाठवण्यात आली होती. याद्वारे रेल्वेत मोठ्या जीवितहानी घडवून आणण्याचा प्रयत्न होता. सुदैवाने रेल्वेत बॉम्बस्फोट न होता सामान उतरविल्यानंतर स्थानकावर हा स्फोट झाला. त्यामुळे जीवितहानी टळली. याच पद्धतीने पंजाबातून रेल्वे पार्सलद्वारे तलवारी पाठवण्यात आल्याचेही गेल्या आठवड्यात उघडकीस आले. यानिमित्ताने पार्सल सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

चौकट १

पुणे स्थानकावरून रोज ८० टन माल पार्सल

पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे ८० टन माल पार्सल सेवेद्वारे विविध ठिकाणी पाठविला जातो. प्रामुख्याने दरभंगा (बिहार), हावडा (पश्चिम बंगाल), दिल्ली, जम्मू तावी (जम्मू) या स्थानकांचा समावेश आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान तसेच दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व केरळमध्येही पुण्यातून रेल्वे पार्सलद्वारे सामान जाते. यात प्रामुख्याने फळे, फुले, भाज्या, टू-व्हीलर, यंत्रसामग्री, कपडे यांचा समावेश आहे.

चौकट २

स्कॅनिंग मशीनची आवश्यकता

विमानतळावर ज्या प्रकारे प्रवाशांच्या बॅगा व अन्य सामान स्कॅनिंग मशीनद्वारे तपासले जाते, त्याप्रमाणे पार्सल ऑफिसमध्ये देखील सामानाचे स्कॅनिंग होणे आवश्यक आहे. मात्र तशी सुविधा सध्या तरी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट ३

खोट्या ओळखपत्राचा वापर

रेल्वे पार्सलद्वारे अन्य राज्यांमधून पुणे स्थानकावर अनेकदा गुटखा, सिगारेट तसेच काही अमली पदार्थ पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी अनेकदा खोट्या ओळखपत्राचा वापर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. खोट्या ओळखपत्राद्वारे पाठवल्या जाणाऱ्या बेकायदा वस्तूंमुळे शोध जागीच थांबल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.

कोट :

“रेल्वेच्या पार्सल सेवेच्या सुरक्षेबाबत अद्याप काही सूचना आलेल्या नाहीत. गरज पडली तर तिथे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ व रेल्वे पोलीस बलाची नियुक्ती केली जाईल.”

रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग.

Web Title: Is it possible to send bombs and weapons by train parcels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.