पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 03:58 PM2023-02-26T15:58:32+5:302023-02-26T19:41:47+5:30

पुणेकर दुपारी झोपत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नक्कीच बाहेर येतात

It proved that Punekar does not sleep in the afternoo That is 12.5 percent voting between 1 and 3 | पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

googlenewsNext

पुणे: विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. परंतु दोन्हीकडे मतदान अत्यंत संथगतीने चालल्याचे निदर्शनास आले होते. दुपारी १ पर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान झाले होते. मात्र आता दुपारी १ ते ३ यावेळेत १२.५ टक्के मतदान होऊन एकूण मतदान ३०.५ टक्के झाले. पुणेकर झोपत नाहीत मतदान करतात हे सिद्ध झाले आहे. 

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मतदानासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले होते. आता दुपारी ३ पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत कसब्यात अवघे एकूण मतदान ३०.५ टक्के झाले आहे. त्यामुळे जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे आव्हान अजूनही राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आहे.

पहिल्या दोन तासात ६.५ टक्के, नंतरच्या दोन तासांत १.७५ टक्के वाढून ८.५ टक्के झाले, नंतर १० टक्के वाढून २८.५ टक्के झाले. पुणेकरांच्या झोपेच्या वेळेत अर्थात १ ते ३ दरम्यान मात्र पुणेकर मतदान करत होते हे सिद्ध झाले. या दोन तासांत १२.५ टक्के मदन होऊन एकूण मतदान ३०.५ टक्के झाले. पुणेकर झोपत नाहीत मतदान करतात हे सिद्ध झाले आहे. 

पुण्यात मागील महापालिकेच्या निवडणुकीत दुपारी देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु दुपारी सभेला गर्दी न झाल्याने फडणवीस यांची सभा रद्द करण्यात आली होती. त्यावेळी पुणेकर दुपारी झोपेच्या वेळेत कोणत्याच गोष्टीला महत्व देत नसल्याची चर्चाही सुरु झाली होती.   

२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.

Web Title: It proved that Punekar does not sleep in the afternoo That is 12.5 percent voting between 1 and 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.