वृक्षारोपणाचा फार्स न करता त्याचे संवर्धन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:25+5:302021-07-02T04:08:25+5:30
नायगाव (ता. हवेली) येथे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक ...
नायगाव (ता. हवेली) येथे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून एक हजार झाडे लावण्याचा उपक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चोबे बोलत होते. यावेळी मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी निवृत्ती गवारी, कोतवाल सुरेश शेलार, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमित घुले, वनपाल अशोक गायकवाड, पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र चौधरी, सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड, सदस्य दत्ता बारवकर, अश्विनी चौधरी, उत्तम शेलार, आरती चौधरी, संगीता शेलार, जितेंद्र चौधरी, बाळासाहेब गायकवाड, प्रियांका गायकवाड व तंटामुक्ती अध्यक्ष कैलास चौधरी उपस्थित होते.
विजयकुमार चोबे म्हणाले की, वृक्ष पर्यावरणाचे संतुलन साधतात याची जाणीव असूनही आपण निसर्गाचे देणे लागतो हे विसरून त्यांस ओरबाडतो आहोत. यामुळे आपण आज अनेक समस्यांना समोरे जात आहोत. संतांनीही वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाचे महत्त्व आपल्या अभंगातून सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक झाडे लावून त्यांची काळजी घ्या, असे अावाहन त्यांनी केले.
०१ लोणी काळभोर वृक्षाराेपण