प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हीच काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:13 AM2021-03-01T04:13:25+5:302021-03-01T04:13:25+5:30
धनकवडी : कोरोनाचे संकट अजून टळले नाही, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हीच काळाची गरज असून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे "मी ...
धनकवडी : कोरोनाचे संकट अजून टळले नाही, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हीच काळाची गरज असून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे "मी माझी जबाबदारी" यांचे पालन करत मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले तरच खऱ्या अर्थाने आपण कोरोना वर मात करू शकतो, असा विश्वास खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोरोना योध्यांना समर्पित व कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून व 'यूथ कनेक्ट फोरम' वतीने दत्तवाडी येथे मी जबाबदार हा संदेश देणारे भित्तीचित्र व सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला आहे. त्याच्या अनावरणप्रसंगी खासदार चव्हाण बोलत होत्या.
या चित्रामध्ये रोग प्रतिकारशक्तीचे रुप दर्शवणारी नारी चित्रीत केली आहे. जी संदेश देते की, हात धुवा, मास्क वापरा करा, सामाजिक अंतर राखा व योग्य आहार घ्यावा. हे चित्र प्रसिद्ध चित्रकार फाल्गुनी गोखले यांचे आहे व प्रसिद्ध चित्रकार संजीव पवार, दिग्विजय कुंभार यांनी ते रेखाटले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष राहुल पोटे व सुशांत ढमढेरे यांनी केले. यावेळी अभिजित बारवकर, प्रियांक शहा, गणेश नलावडे, कृष्णा मेहता, गणेश मोहीते, विनायक हनमघर, समिर पवार, विकी वाघे, स्वीकार देशपांडे, सचिन बेनकर, फईमभाई शेख, गितांजली सारगे, अश्विनी परेरा, सोनाली गाडे, श्रद्धा जाधव तसेच युथ कनेक्ट चे सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत अभिजित बारवकर यांनी केले तर आभार सुशांत ढमढेरे यांनी व्यक्त केले.