जेवणाची ऑनलाईन ऑर्डर करणे पडले महागात, ज्येष्ठाची १० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 03:21 PM2021-03-23T15:21:46+5:302021-03-23T15:22:33+5:30
याप्रकरणी एका ८३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पुणे : गुगलवर सर्च करुन मिळालेल्या फोनवर संपर्क करुन जेवणाची ऑर्डर देणे, एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. फोनवरुन बोलणार्या सायबर चोरट्याने त्यांच्याकडून माहिती घेऊन बँक खात्यातून ऑनलाईन ९ हजार ९९९ काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी एका ८३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या ज्येष्ठ नागरिकांने १९ डिसेंबर २०२० रोजी घरी असताना घरपोच जेवणाची ऑर्डर कशी मिळेल, यासाठी गुगलवर स्विगीचा फोन नंबर सर्च केला. त्यावर मिळालेल्या नंबरवर त्यांनी संपर्क केला. समोरुन बोलणार्याने फिर्यादीची ऑर्डर घेताना त्यांच्या स्टेट बँक खात्यामधून ऑनलाईन ९ हजार ९९९ रुपये ट्रॉन्सफर करुन घेऊन फसवणूक केली.