प्रेयसीनेच केला प्रियकराच्या पत्नीचा खून; दोन दिवसानंतर उलघडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:37 PM2022-11-21T14:37:10+5:302022-11-21T14:37:33+5:30

खेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीमार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवसांत गुन्ह्याची उकल केली

It was the lover who killed the lover's wife Unfold after two days | प्रेयसीनेच केला प्रियकराच्या पत्नीचा खून; दोन दिवसानंतर उलघडा

प्रेयसीनेच केला प्रियकराच्या पत्नीचा खून; दोन दिवसानंतर उलघडा

Next

राजगुरूनगर : पतीच्या प्रेयसीने या प्रियकराच्या पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना राजगुरूनगरमध्ये घडली. घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून झाला होता. घटना घडल्यावर दोन दिवसांत खून पतीच्या प्रेयसीनेच केल्याचा उलगडा करून खेडपोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे. स्वाती सुभाष रेंगडे (वय २१, रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, खेड, ता. खेड, मूळ रा. गोद्रे, ता. जुन्नर ) असे प्रेयसीचे नाव असून, तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

१६ नोव्हेंबरला राजगुरूनगर शहरातील शिवसाम्राज्य सोसायटी येथील राहत्या घरी कोमल गणेश केदारी ही मृतावस्थेत आढळून आली. तिचा पती गणेश भिकाजी केदारी हा कामावर गेला असता, ती दुपारी एकटी असल्याने अज्ञात इसमाने गळा आवळून तिचा खून केला होता. खेड पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे काही धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. खेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीमार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवसांत गुन्ह्याची उकल केली. मृत महिला कोमल गणेश केदारी हिचा पती गणेश भिकाजी केदारी याची प्रेयसी स्वाती रेंगडे हिनेच खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. खेडचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस निरीक्षक राहुल लाड, संतोष घोलप, संतोष मोरे, सचिन जतकर, प्रवीण गेंगजे, नीलम वारे, अभिजीत सावंत, विक्रम तापकीर, राजू मोमीन, नीलेश सुपेकर, दगडू विरकर, शंकर भवारी, कैलास कड यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.

Web Title: It was the lover who killed the lover's wife Unfold after two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.