Pune: सुरक्षारक्षकानेच केला सोसायटीत खेळणाऱ्या मुलींचा विनयभंग, रामटेकडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:31 AM2024-06-19T10:31:58+5:302024-06-19T10:33:25+5:30

पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी हडपसर भागात ही ...

It was the security guard who molested the girls playing in the society, incident in Ramtekdi area | Pune: सुरक्षारक्षकानेच केला सोसायटीत खेळणाऱ्या मुलींचा विनयभंग, रामटेकडी परिसरातील घटना

Pune: सुरक्षारक्षकानेच केला सोसायटीत खेळणाऱ्या मुलींचा विनयभंग, रामटेकडी परिसरातील घटना

पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी हडपसर भागात ही घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. बहादूरसिंग अनंतसिंग मेहता (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बहादूरसिंग मेहता हा रामटेकडी हडपसर भागातील एका सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करतो. फिर्यादी यांच्या मुली या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत होत्या. यावेळी आरोपी मेहता तिथे आला, त्याने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न केला असता तिने सुटका करून घेतली. यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या लहान मुलीला मोबाइल दाखविण्याचे आमिष दाखवून जवळ ओढून उचलून मिठीत घेत तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आदलिंग करीत आहेत.

Web Title: It was the security guard who molested the girls playing in the society, incident in Ramtekdi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.