आता नक्की पूर्ण होणार! चांदणी चौकातील प्रकल्पाचे ९५ टक्के काम मार्गी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:00 AM2023-07-12T10:00:01+5:302023-07-12T10:00:27+5:30

चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग

It will be completed now! 95 percent of Chandni Chowk project complete; District collector inspected | आता नक्की पूर्ण होणार! चांदणी चौकातील प्रकल्पाचे ९५ टक्के काम मार्गी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

आता नक्की पूर्ण होणार! चांदणी चौकातील प्रकल्पाचे ९५ टक्के काम मार्गी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

googlenewsNext

पुणे: चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. चांदणी चौक प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलै, ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्रकल्प संचालकांनी दिली.

चांदणी चौकात गर्डर बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले असून, ३२ गर्डरपैकी २५ गर्डर बसविले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी मंगळवारी केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्य:स्थितीतील कामाबद्दल व चौकातील इतर कामांबद्दल आढावा घेतला. डाॅ. देशमुख म्हणाले, चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे व स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर केल्या आहेत. गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

३२ पैकी २५ गर्डरचे काम पूर्ण 

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे ९ पैकी ५ गर्डरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. सेवा रस्त्याच्या ४ स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून, इतर तत्सम कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: It will be completed now! 95 percent of Chandni Chowk project complete; District collector inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.