"राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी काम केले तर आनंदच होईल", जयंत पाटील

By श्रीकिशन बलभीम काळे | Published: September 18, 2022 03:45 PM2022-09-18T15:45:45+5:302022-09-18T15:46:51+5:30

अकार्यक्षम एकनाथ शिंदेंमुळे वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला

It will be happiness if Raj Thackeray works for his own party Jayant Patil | "राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी काम केले तर आनंदच होईल", जयंत पाटील

"राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी काम केले तर आनंदच होईल", जयंत पाटील

Next

पुणे : द डेक्कन शुगर टेक्ना‘ला‘जीट्स असोसिएशनतर्फे (डीएसटी) आयोजित दोन दिवसीय वार्षिक साखर परिषदेचे उद्घाटन पुण्यात रविवारी सकाळी झाले.  यावेळी साखर गौरव पुरस्कार म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.  उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.  राज ठाकरे प्रचारासाठी विदर्भात गेले ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या पक्षासाठी काम करावे. त्यांनी तसे केले तर आनंदच होईल. असं पाटील म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकार्यक्षमतेमुळे हे घडले आहे. दिल्लीतूनही दबाव आल्याने प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातला नेला. महाराष्ट्रातील ३-४ लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सरकार स्थापन होऊनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेनात. कारण या सरकारमध्येच मतभिन्नता असेल, त्यामुळेच पालकमंत्री नेमले जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांतील अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत, असेही पाटील म्हणाले.

शिंदे गटाने वेगळ्या ठिकाणी मेळावा घ्यावा

शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आले आहेत. त्यांची एक परंपरा आहे. आता जर शिवसेनेतून कोणी फुटून बाहेर पडले असेल, तर त्यांनी त्यांचा मेळावा दुसऱ्या मैदानावर घ्यावा. मेळाव्यावर परंपरागत क्लमे शिवसेनेचा आहे, शिंदे गटाने वेगळ्या ठिकाणी मेळावा घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राजकीय विचार बदलले की ईडी सॉफ्ट

ईडी प्रताप सरनाईक यांच्या मागे लागली होती. पण आता त्यांच्यात कोणताही दोष नसल्याचा निष्कर्ष ईडीने काढला आहे. त्यांचे प्रकरण बंद केले जात आहे. हे परिवर्तन का झाले, हे देशाला समजत आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचे हे उदाहरण आहे. राजकीय विचार बदलले की ईडी सॉफ्ट होते, असे पाटील म्हणाले.

Web Title: It will be happiness if Raj Thackeray works for his own party Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.