बारामतीत सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:24+5:302021-08-21T04:15:24+5:30

आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण बारामती : बारामती शहरात १०० खाटांची क्षमता असणारे मोड्युलर ...

It will start in Baramati | बारामतीत सुरु होणार

बारामतीत सुरु होणार

Next

आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बारामती : बारामती शहरात १०० खाटांची क्षमता असणारे मोड्युलर स्वरुपातील अभिनव रुग्णालय सुरू करण्यात होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या रुग्णालयाचं शनिवारी(दि २१) लोकार्पण करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत मास्टरकार्ड प्रशासन संपर्क प्रमुख आर बी संतोषकुमार, अमेरीकन इंडीया फाउंडेशनचे संचालक मॅथ्यु जोसेफ, मास्टकार्ड चे संचालक निशांत गुप्ता, सीमा व्यास, विनय अय्यर आदी उपस्थित राहणार आहे.

बारामतीसह आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना या रुग्णालयामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुई ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात हे १०० खाटांचे संपुर्ण फॅब्रिकेटेड स्वरुपाचे पहिलेच रुग्णालय उभारण्यात आले आहे. मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरिका-इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून दोन आयसीयु, सात आयसोलेशन वार्डसह अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा १०० खाटांच्या मेडिकॅब हॉस्पिटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीमार्फत संपूर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात बारामतीसह अमरावती व जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. अशा पद्धतीचे आधुनिक रुग्णालय बारामतीत सुरु झाल्याने बारामतीकरांना कोविड संकटात दिलासा मिळाला आहे.

बारामतीच्या नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. येथे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्याबरोबरच तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात बेडस उपलब्ध करुन देण्यात आले. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यादृष्टीने पेटीएमच्या वतीने ऑक्सिजन प्लँटचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या ठिकाणी पाणी, वीज व ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. मेडिकॅब हॉस्पिटलची रचना व क्षमता या हॉस्पिटलमध्ये तपासणी व निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष, अलगीकरण कक्ष हे चार विभाग आहेत. या ठिकाणी ९२ अत्याधुनिक विलगीकरण खाटा, ८ अत्याधुनिक अतिदक्षता खाटा अशा एकूण १०० खाटा आहेत. त्याशिवाय सेंट्रल ऑक्सिनज सुविधा, आयसीयूमध्ये एन.आय.व्ही. सुविधा, विलगीकरण कक्षामध्ये ऑक्सजिन कॉन्संट्रेटर, मल्टिपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन मेनिफोल्ड व ड्युरा सिलेंडर्स, दोन पाण्याच्या टाक्या, याशिवाय आवश्यक असलेल्या इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

————————————————

फोटोओळी— बारामती शहरात १०० खाटांची क्षमता असणाºया मोड्युलर स्वरुपातील अभिनव रुग्णालय सुरू करण्यात होत आहे.

२००८२०२१ बारामती—०५

———————————

Web Title: It will start in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.