थापाड्या चीनच्या सैन्यमाघारीवर विश्वास ठेवणे चूकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:10+5:302021-02-12T04:12:10+5:30
पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची ...
पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची वृत्ती आहे. १९६२, १९६७, नथूला, डाेकलाम तसेच गलवान खोऱ्यात हे सिद्ध झाले आहे. यामुळे सैन्यमाघारी घेणे हा चीनची चाल असू शकते. यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारतीय सैन्यांने आपली सीमेवरील क्षमता अधिक वाढवून चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवे. या साठी आधूनिक सांधनांचा वापर करायला हवा, असे मत लष्करी अभ्यासकांनी व्यक्त केले.
चीनने लडाख सीमेवरून एकतर्फी सैन्यमाघारी घेत असल्याचे घोषित केले. या बाबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर म्हणाले, चीनने भारताची वांवरवांर फसवणूक केली आहे. भारताच्या मोठ्या भूभाग त्यांनी हडप केला आहे. यामुळे ही सैन्य माघार म्हणजे त्यांची एक चाल आहे. या पूर्वीही त्यांचा खोेटेपणा ऊघड झाला आहे. यामुळे भारतीय सैन्यांनी गाफील न राहता सीमेवरील सामारिक दृष्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर आपली पकड आणखी घट्ट करायला हवी. कारण भारतीय सैन्य हे मोक्याच्या ठिकाणी आहे. चीनला हे सलत आहे.
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत असतांना गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली. तसेच सैन्य घाघारी न घेता भारतीय सैन्यांवर हल्ला केला. यात भारतीय जवान हुतात्मा झाले. यामुळे सैन्यमाघारी ही शुद्ध फसवणून आहे. भारतीय सैन्यांनी चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या साठी आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रहाचा वापर करायला हवा. चीन भारतीय सीमांवर नवी वसाहत उभारू पाहत आहे. याद्वारे पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून माल नेऊ पाहत आहे. यामुळे भारतीयांनी दक्ष राहणे हे गरजेचे आहे.
चीन सैन्य माघार घेत आहे हा भारताचा नैतीक विजय मानायला हवा. कारण लष्कर शक्तीचे प्रदर्शन करत आम्ही शक्तीशाली आहोत असा आव चीनने आणला होता. याचा बागुलबुवा आपल्या माध्यमांनीही केला होता. मात्र, भारताचे काही बिघडले नाही. उलट गलवान खोऱ्यात आपणच त्यांच्या सैन्यांची पिटाई करत त्यांचे ७० ते ८० सैनिक मारले. रशियाच्या एका न्यूज एजन्सीनेही या बाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. या नंतर आपण कैलास पर्वत रांगावर जात सामरिक दृष्ट्या महत्वाच्या जागांवर ताबा मिळवला. यामुळे चीनचे जे उद्देश होते ते सफल झाले नाही. चीन जरी सैन्य माघारी घेत असला तरी चीन हा विश्वास घातकी देश आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.