आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 02:59 AM2019-01-06T02:59:19+5:302019-01-06T03:00:00+5:30

पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी : कामगार आयुक्तांकडे मागितली जातेय दाद

Itinens on compulsory leave, salaries, but do not need to be holidays | आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी

आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी

Next

सुनील गाडेकर

पुणे : प्रोजेक्टची संख्या कमी झाल्याने नफा कमी होवू लागल्याने आयटी क्षेत्रातील अनेक कपंन्या मोठा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचा अजब प्रकार संध्या सुरू आहे. सुटीची गरज नसताना १० ते १५ दिवस घरी थांबावे लागत असल्याने आयटीयन्स हैराण झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत हिंजवडी, औध, बाणेर, बालेवाडी, विमाननगर कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. परदेशात एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळ याची तुलना केली असता भारतात तो त्वरित व कमी पैशात तयार केला जात असल्याने अनेक परदेशी कंपन्या त्यांची कामे पुणे आणि बंगळुरूमध्ये असलेल्या आयटी कंपन्यांना देत असतात. त्यामुळे परदेशी कंपन्याकडून प्रोजेक्ट मिळवून त्यावर काम करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या पुण्यात कार्यरत आहेत. मात्र डिसेंबरमध्ये नाताळाच्या सुट्यांमुळे अनेक कंपन्यांना अपेक्षित प्रोजेक्ट न मिळाल्याने कर्मचाºयांना काय काम द्यायचे, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे कर्मचाºयांवरील खर्च कमी करण्यासाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जात आहे. संबंधित सुटीच्या दिवसांचा पगार कर्मचाºयांना दिला जातो. पण गरज नसताना सुटी घ्यावी लागत असल्याने कर्मचाºयांमध्ये रोष निर्माण होताना दिसतो आहे.
या प्रकाराबाबत शहरातील एका बड्या कंपनीतील काही कर्मचाºयांनी कामगार आयुक प्रशासनाकडे तक्रारदेखील केली आहे. त्यांना डिसेंबर महिन्यात १५ दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना बोलावून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तालयाकडून
स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान सक्तीने रजा देण्याचे प्रकार वर्षभर सुरू असतात. मात्र, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सर्वाधिक कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठविलेले जातात. आयटी कंपन्यांमधील अनेक कामे ही परदेशातून आलेले असतात. डिसेंबरमध्ये नाताळाच्या निमित्ताने परदेशातील कंपन्यांना सुमारे २० दिवस सुटी असते. त्यामुळे त्या काळात त्यांच्याकडून कोणतेच प्रोजेक्ट पाठविले जात नाहीत, अशी माहिती फोरम फॉर आयटी एम्लोयीचे राज्य अध्यक्ष पवनजित माने यांनी दिली.

... तर पुढील वर्षाच्या सुट्या घ्या
डिसेंबर अखेरीस अनेकांच्या सुट्या संपलेल्या असतात. त्यामुळे सक्तीच्या सुट्या घेत असताना त्याचा पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून करण्यात येते.
त्यामुळे त्यांना पुढील वर्षीच्या सुट्या वापरण्याची मुभा दिले जाते. तसेच सक्तीच्या सुट्या आपोआप प्रत्येकाच्या सिस्टीमला अपलोड केल्या जातात. त्यामुळे इच्छा नसली तर सुट्या घ्याव्याच लागतात.

जानेवारीत भरती... कायम असलेल्या कर्मचाºयांना सक्तीच्या सुटीवर तर कंत्राटी पद्धतीने घेतलेल्यांना कायमचेच घरी पाठविले जाते. कायम कर्मचारºयांना सुटीचे पैसे देणे कंपनीला बंधनकारक असते. मात्र, कंत्राटी मुलांना तशी सुविधा मिळत नाही. त्यामुळे पुरेसे काम नसेल तेव्हा कंत्राटी कर्मचाºयांना थेट कामावरून काढून टाकले जाते. त्यानंतर जानेवारीत गरज असेल तेव्हा पुन्हा नवीन मुलांना संधी दिली जाते.

बिल न आल्याचे कारण
परदेशी कंपनी एखादा प्रोजेक्ट देताना त्यासाठी काम करणाºयांना प्रतितास किती पैसे द्यायचे, हे आधीच ठरवतात.

परदेशी कंपनी सुमारे १५ ते २० डॉलर प्रतितास या पद्धतीने पैसे देते. मात्र, येथील कंपन्या कर्मचाºयांना प्रतितास ५ डॉलरप्रमाणे पैसे देतात.

मात्र, सुटी असल्याने कामच झाले नाही. त्यामुळे आपल्या कामाचे अजून बिल आले नाही. बिल न आल्याने पगार देता येत नसल्याचा बहाणा कंपन्यांकडून केला जात आहे.
 

Web Title: Itinens on compulsory leave, salaries, but do not need to be holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे