शाळा सुरू होऊन झाला एक महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:25+5:302020-12-23T04:09:25+5:30
पुणे : कोरोनानंतर आरोग्याची काळजी घेत राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होऊन एक महिन्या पूर्ण झाला असून ...
पुणे : कोरोनानंतर आरोग्याची काळजी घेत राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होऊन एक महिन्या पूर्ण झाला असून या कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिवसेंदिव वाढ होत चालली आहे.मात्र,जिल्ह्यातील निमशहरी भागातील शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनातर्फे कोरोनाबाबत खबरदारी घेऊन २३ नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे तब्बल आठ महिने बंद असलेल्या राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी धडे गिरवण्यास सिुरूवात केली.सुरूवातीला संपती पत्र देवून शाळेत पाठविण्यास पालकांनी नकार दिला.मात्र,दिवसेंदिवस शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती पाहून अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार झाले.सध्या शहरी भागातील शाळा सुरू नसल्या तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये ८० ते ९० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत.
मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील काही निमशहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे. तर ग्रामीण भागातील शाळामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 85 ते 95 टक्क्यांपर्यंत आहे. नववीच्या वर्गातही ७० ते ८० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.दिवसेंदिवस या उपस्थितीत वाढ होत आहे. शहरीभागातही शाळा सुरू करण्यास अनुकुल वातावरण असून शाळा सुरू करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे.