"बरं झालं लेकरू घरी आलं", डुग्गुबाबत पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:12 PM2022-01-19T17:12:49+5:302022-01-19T17:20:26+5:30

पुण्यातील असंख्य आई वडिलांना डुग्गु सापडल्याची बातमी कळल्यावर भरभरून आनंद झाला

It's good the boy has come home the feelings expressed by the people of pune about swarnav chavhan | "बरं झालं लेकरू घरी आलं", डुग्गुबाबत पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

"बरं झालं लेकरू घरी आलं", डुग्गुबाबत पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

Next

पुणे: पुण्याच्या बालेवाडीतून मागील आठवड्यात स्वर्णव चव्हाण (डुग्गु) याचे अपहरण झाले होते. त्याच्या वडिलांनी फेसबुकच्या माध्यमातून भावनिक पोस्टही केली होते. स्वर्णवच्या अपहरणानंतर पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. अखेर देवाची साथ आणि सोशल मीडियाच्या ताकदीतून पोलिसांना डुग्गूला शोधण्यात यश आले. त्याबद्दल पुणेकरांकडून पोलिसांचे विशेष आभार मानले जात आहेत. तर नागरिक सोशल मीडियावर भावना व्यक्त करू लागले आहेत. 

पुण्यातील असंख्य आई वडिलांना डुग्गु सापडल्याची बातमी कळल्यावर भरभरून आनंद झाला आहे. त्यांना आपलाही मुलगा नेहमीच सुरक्षित राहील. असा विश्वास पुणे पोलिसांकडून मिळाला आहे. त्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डुग्गुला शुभेच्छाही दिल्या आहेत. 

''आज त्यांना मुलगा मिळाला. त्यांना खूप आनंद झाला असून पुणे पोलिसांचे विशेष आभार नागरिकांनी मानले आहेत. तर अभिनंदन सहिसलामत मिळाला त्याबद्दल देवाचे आभार हि पोस्ट वाचून खुप आम्हाला आनंद झाला. तर मुलाच्या आईवडिलाना तर किती आनंद झाला असेल कल्पना करवत नाही. असेही ते म्हणाले आहेत.'' 

''देव कृपेने तो सुखरूप घरी आला त्याबद्दल आम्ही पोलिसांचे आभारी आहे. पण अपहरण कर्त्याच्या चुकीची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन त्याला शिक्षा द्यावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.''

''आई वडिलांना एवढे दिवस काढले असतील? असा सवाल उपस्थित करत अनेक जण भावनिकही झाले आहेत. ती माऊली आता आपल्या लेकराला मन भरेपर्यंत कवटाळून मिठी मारेल. अशा प्रकारे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.''

शोधमोहिमेत जवळपास ३०० ते ३५० वर पोलीस कर्मचारी व अधिकारी

स्वर्णवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.

 कोणी अपहरण केलं? का केलं? याचा तपास सुरु 

चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

Web Title: It's good the boy has come home the feelings expressed by the people of pune about swarnav chavhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.