बालभारती ते पाैडराेडची वाट बिकटच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 08:38 PM2018-12-12T20:38:35+5:302018-12-12T20:40:11+5:30
बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे.
पुणे : बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. त्यामुळे काेथरुडवासीयांना अजून काही वर्षे वाहतूक काेंडीतच अडकून पडावे लागणार अाहे.
सुमारे 15 वर्षांपासून बालभारती- पाैड राेड हा रस्ता प्रस्तावित अाहे. या रस्त्याला वेळाेवेळी पर्यावरणवादी अाणि विधी महाविद्यालयाने केलेल्या विराधामुळे हा रस्ता कागदावरच राहिला अाहे. काेथरुडची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सेनापती बापट रस्त्यावरुन पाैड राेडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही प्रमाणाबाहेर झाली अाहे. सेनापती बापट रस्त्याकडून पाैड राेडकडे जाण्यासाठी लाॅ काॅलेज रस्ता हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहतकू काेंडी असते. सकाळी अाणि संध्याकाळच्यावेळी याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यातच अाता नळस्टाॅप चाैकात मेट्राेचे काम सुरु करण्यात येणार असल्याने यात अाणखीनच भर पडणार अाहे. दाेन दिवसांपूर्वी मेट्राेच्या कामासाठी प्रायाेगिक तत्वावर कर्वे रस्त्याच्या दाेन्ही बाजूंची एक लेन बंद केल्याने माेठी वाहतूक काेंडी या भागात झाली हाेती. त्यामुळे हा प्रयाेग त्याच दिवशी गुंडाळण्यात अाला. तसेच या भागात काही महिन्यांपूर्वी करण्यात अालेला चक्राकार वाहतूकीचा प्रयाेगही फसल्याने वाहतूक काेंडी कशी फाेडता येईल या प्रश्नात मेट्राे प्रशासन अाणि वाहतूक पाेलीस पडले अाहेत. त्यातच या वाहतूकीवर ठाेस पर्याय जाेपर्यंत शाेधण्यात येत नाही ताेपर्यंत या भागातील मेट्राेच्या कामाला परवानगी देणार नसल्याचे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी जाहीर केले अाहे.
बालभारती ते पाैड रस्त्यापर्यंत टेकडीच्या कडेने पायवाट अाहे. या ठिकाणावरुन अनेक लाेक ये जा करत असतात. या टेकडीवर काही वर्षांपूर्वी वनविभागाकडून माती धरुन रहावी म्हणून झाडे लावण्यात अाली हाेती. सध्या या ठिकाणी माेठ्याप्रमाणावर घनदाट झाडे अाहेत. त्यामुळे रस्ता करायचा झाल्यास येथील शेकडाे झाडांचा बळी द्यावा लागणार अाहे. या टेकडीवर अनेक नागरिक सकाळी अाणि संध्याकाळच्या वेळी फिरण्यास येत असल्याने तसेच माेरांबराेबरच अनेक पक्षांचा या टेकडीवर अधिवास असल्याने पर्यावरण प्रेमींचा या रस्त्याला विराेध अाहे. ज्या ठिकाणावरुन हा रस्ता हाेणार अाहे त्या ठिकाणी पाण्याची माेठी वाहिनी गेली असल्याने ही वाहीनी हलवावी लागणार अाहेतसेच टेकडीचा काही भाग फाेडून रस्ता तयार करावा लागणार अाहे. त्यासाठी माेठा कालावधी लागण्याची शक्यता असली तरी सध्या अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान पाहता हा रस्ता लवकरणे सुद्धा शक्य अाहे. त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती महत्त्वाची अाहे. हा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेकडून पर्यावरण अाघात मूल्यांकन अाणि वाहतूक अाराखडा तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या निविदा मागविण्यात अाल्या अाहेत. यासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 13 डिसेंबर असून, त्यानंतर लवकरच पर्यावरण अाघात मूल्यांकन व वाहतूक अाराखड्याचे काम सुरु हाेणार अाहे.