इटस अ लीकी इश्यू ! अनैैच्छिक लघवी होण्याची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:33 AM2018-09-27T02:33:17+5:302018-09-27T02:33:50+5:30
महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते.
पुणे - महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते. स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स या आजाराबाबत आजही महिला जागृत नसल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. भारतात १२ टक्के महिला या आजाराने पीडित असल्याचा अंदाज वैैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवला आहे. जगभरातील ४५ वर्षांवरील २०.८ टक्के महिलांमध्ये हा आजार आढळून येतो. महिला बऱ्याचदा हा आजार अंगावर काढतात; कारण त्यांना याबाबत चर्चा करण्याची लाज वाटते. हा आजार वैद्यकीय उपचारांसह बरा होऊ शकतो. याबाबत त्यांच्यामध्ये पुरेशी जागरूकतादेखील दिसून येत नाही, असे निरीक्षण पुण्यातील इंटरनॅशनल सोसायटी फॉर गायनॅकोलॉजी एन्डोस्कोपीने नोंदवले आहे. डॉ. सुनीता तांदुळवाडकर म्हणाल्या, ‘एसयूआय हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक दिसून येतो. सामाजिक जीवनातील जीवनशैलीमधून अनेक व्यक्तींना एसयूआय आजार होतो.
रुग्ण हा आजार कुटुंब, मित्र व डॉक्टरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात. या आजाराबाबत लाज वाटणे, गैरसमज आणि दुर्लक्ष
अशा गोष्टींमुळे महिला उपचार
घेणे टाळतात. उपचार घेण्यामध्ये विलंब केल्याने हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो. या आजाराच्या तणावामुळे सामाजिक जीवन व राहणीमानाच्या दर्जावरदेखील परिणाम होऊ शकतो.’
वय हे या आजारामागचे एक कारण आहे. वाढत्या वयासह शरीरात होणारे बदलदेखील एसयूआय होण्यास कारणीभूत ठरू शकतात. प्रसूतीनंतरही एसयूआयचा त्रास होऊ शकतो. कारण, प्रसूतीदरम्यान ऊती किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते. या इजांमुळे एसयूआय आजार प्रसूतीनंतर लगेच किंवा काही वर्षानंतर होऊ शकतो.
- डॉ. रिश्मा पै, अध्यक्षा,
इंडियन असोसिएशन आॅफ गायनॅकोलॉजिकल एन्डोस्कोपीस्ट्स
एसआययू म्हणजे काय?
मूत्राशयाला मदत करणारे स्नायू व इतर ऊती, लघवी बाहेर पडण्यामध्ये मदत करणारे स्नायू कमकुवत झाल्याने एसयूआय आजार होतो.
लठ्ठ आणि हिस्टेरक्टॉमी झालेल्या महिलांनादेखील हा आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारादरम्यान प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे एसयूआय होऊ शकतो.
वैयक्तिक स्वच्छता हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. या आजारामुळे त्वचा संसर्ग व मूत्रपिंडविषयक आजार होऊ शकतात.
या आजारावर अत्यंत कमी इन्वेसिव्ह प्रक्रियांसह सुलभपणे व परिणामकारक उपचार करता येऊ शकतो.