नोटांचा पाऊस अन् जेसीबीने गुलालाची उधळण; पुणे जिल्ह्यातील मिरवणुकीची सोशल मीडियावर धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:46 PM2021-02-25T13:46:31+5:302021-02-25T14:42:57+5:30

नाद करायचा नाय! पुणे जिल्ह्यातील मिरवणुकीची सोशल मीडियावर हवा

It's literally raining money in sarpanch elections in pune district | नोटांचा पाऊस अन् जेसीबीने गुलालाची उधळण; पुणे जिल्ह्यातील मिरवणुकीची सोशल मीडियावर धुरळा

नोटांचा पाऊस अन् जेसीबीने गुलालाची उधळण; पुणे जिल्ह्यातील मिरवणुकीची सोशल मीडियावर धुरळा

googlenewsNext

दावडी : ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की गावातील कार्यकर्त्यांच्या जल्लोष आणि उत्साहाला काही मर्यादा नसते. असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. सरपंचपदाचीनिवडणूक झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी क्रेनच्या साह्याने नवनिर्वाचित सरपंच- उपसरपंचांना हार घालत जेसीबीने गुलाल व भंडाऱ्याची उधळण केली. एका कार्यकर्त्याने तर कहर म्हणजे मिरवणुकीत चक्क नोटाचे बंडले काढून पैशाचा पाऊसच पाडला.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 


खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी हे मोठे गाव आहे.या ग्रामपंचायतवर १३  सदस्य आहे. सरपंच पद हे सर्वसाधारण आहे.सरपंच पदासाठी संभाजी घारे यांचा एकमेव अर्ज तर उपसरपंच पदासाठी राहुल कदम यांचा एकमेव अर्ज आला.यावेळी या निवडणुकीच्या सभेत सर्वपक्षीय श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे फक्त आठच सदस्य हजर होते.त्यामुळे सरपंच संभाजी घारे तर उपसरपंच राहुल कदम यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री सिताराम तुरे यांनी काम पाहिले. त्यांना कामगार तलाठी श्री शेळके भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी श्री इसवे भाऊसाहेब व पोलिस पाटील आत्माराम डुंबरे यांनी सहकार्य केले.यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असणार आहे असे सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित सदस्या सौ.राणीताई डुंबरे, माधुरी खेसे,पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर, अनिल नेटके,संतोष सातपुते हजर होते.
यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुलदादा जाधव, जिल्हापरिषद सदस्य अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे युवानेते मयुर मोहिते, शिवसेनेचे युवानेते विजयसिंह शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
.

Web Title: It's literally raining money in sarpanch elections in pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.