आॅनलाईन पासिंग अपॉर्इंटमेन्ट मिळण्यासाठी होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:52 AM2017-12-27T00:52:15+5:302017-12-27T00:52:17+5:30

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिवे येथे २५० मीटरचा पासिंग ट्रॅक तयार केला आहे.

It's OK to get an online passing appointment | आॅनलाईन पासिंग अपॉर्इंटमेन्ट मिळण्यासाठी होतेय दमछाक

आॅनलाईन पासिंग अपॉर्इंटमेन्ट मिळण्यासाठी होतेय दमछाक

Next

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिवे येथे २५० मीटरचा पासिंग ट्रॅक तयार केला आहे. मात्र, त्यामुळे पासिंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अनेक वाहनांना पासिंगची मुदत संपल्यानंतरही पासिंगसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागते. परंतु, आरटीओच्या संकेतस्थळावरून पासिंगची अपॉर्इंटमेन्ट मिळत नसल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून दिवे येथील २५० टेस्टिंग ट्रॅकवर वाहनांचे पासिंग केले जाते. मात्र, दररोज केवळ ७५ वाहनांचेच पासिंग होते. परंतु, पासिंगची मुदत संपलेले तब्बल सात हजार वाहनचालक अपॉर्इंटमेन्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या एक महिन्याच्या अपॉर्इंटमेन्ट बुक झाल्या आहेत.
मात्र, एक महिन्यानंतरची अपॉर्इंटमेन्ट मिळत नाही. ज्या वाहनांचे पासिंग संपले आहे, त्या वाहनचालकांना पासिंगसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागते. त्यामुळे रात्री १२ वाजल्यापासून अनेक वाहनचालक संगणकासमोर बसून अपॉर्इंटमेन्ट मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अपॉर्इंटमेन्ट काही मिळत नाही. त्यामुळे पासिंगची मुदत संपलेल्या वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात फेºया माराव्या लागत आहेत.
>हजारो वाहनांचे पासिंग रखडले
आरटीओमध्ये यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हजारो वाहनांचे पासिंग रखडले आहे. मात्र, काही दिवसांपासून रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस अशा विविध वाहनांचे पासिंग दिवे येथे सुरू करण्यात आले आहेत.
या ट्रॅकवर पासिंगची व्यवस्था करण्यास सुरुवात झाली असली तरी अपॉर्इंटमेन्ट देण्याच्या यंत्रणेत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच दररोज केवळ ७५ वाहनांना अपॉर्इंटमेन्ट दिली जात आहे. त्यातही पुढील महिनाभराच्या अपॉर्इंटमेन्ट बुक झाल्या आहेत. केवळ २ हजार २२५ वाहनांना अपॉर्इंटमेन्ट मिळाल्या आहेत. मात्र, पासिंगची मुदत संपल्याने अनेक वाहनांना व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने किमान वाहनांना पासिंगसाठीची अपॉर्र्इंंटमेन्ट देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे वाहनचालकांना आपला व्यावसाय सुरूठेवता येईल, अशी मागणी प्रवासी व माल- वाहतूकदारांनी केली आहे.

Web Title: It's OK to get an online passing appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.