आयव्हीएफ तंत्रज्ञान : मातृत्वाचा आनंद ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:02+5:302021-07-25T04:10:02+5:30

शिक्षण, नोकरी, करियरला प्राधान्य देण्याच्या नादात लग्नाचं वय वाढू लागलंय. त्याचा परिणाम जोडप्यांच्या प्रजननक्षमतेवर होऊ लागला आहे. मूल ...

IVF technology: the joy of motherhood; | आयव्हीएफ तंत्रज्ञान : मातृत्वाचा आनंद ;

आयव्हीएफ तंत्रज्ञान : मातृत्वाचा आनंद ;

Next

शिक्षण, नोकरी, करियरला प्राधान्य देण्याच्या नादात लग्नाचं वय वाढू लागलंय. त्याचा परिणाम जोडप्यांच्या प्रजननक्षमतेवर होऊ लागला आहे. मूल होणे हा तसा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही क्षण; पण या गतिमान काळात अनेक वैद्यकीय सुविधा असूनही या आनंदाच्या क्षणावर नवीन-नवीन अडचणींचे सावट येत आहे. मात्र ज्या पती-पत्नींना, स्त्रियांना बाळ हवंय त्यांच्यासाठी विज्ञानाच्या मदतीने डॉक्टर्स, संशोधक कायमच मदतनीस ठरले आहेत. कारण निसर्गाला आव्हान देत विज्ञानाने नेहमीच प्रगती केलीय.

आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलाइजेशन होय. यामध्ये महिलेच्या अंडाशयातून बीज घेऊन त्याला वीर्यासोबत फर्टिलाइज केले जाते. स्त्रिया नैसर्गिकरीत्या गरोदर न राहण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जर फेलोपीयान ट्यूब ब्लॉक किंवा डॅमेज असेल, पुरूषामध्ये स्पर्म काउंट कमी असेल, स्त्रीला ओवूलेशनची समस्या असेल, प्रिमेच्युअर ओवेरीयन फेल्युअरवा गर्भाशयात समस्या असले तरी गरोदर राहण्यात अडथळा निर्माण होतो. ज्या स्त्रियांच्या फेलोपियन ट्यूब काढून टाकली आहे किंवा त्या कोणत्या अनुवांशिक विकाराने ग्रस्त असतील आणि गरोदर राहत नसतील तर आयव्हीएफ प्रक्रियेचा वापर केला जातो.

-आययुआय (IUI ) ही पद्धतही उपयुक्त ठरत आहे. ही एक फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये स्पर्म स्त्रीच्या गर्भाशयामध्ये थेट टाकले जाते. नॉर्मल गरोदर राहण्याच्या प्रक्रियेमध्ये स्पर्म गर्भाशय ग्रीवाच्या माध्यमातून योनीपर्यंत पोहोचते. फेलोपियन ट्यूबच्या मदतीने गर्भाशयापर्यंत येते. नैसर्गिक पद्धतीने जेव्हा ही प्रक्रिया होत नाही तेव्हा आययुआयच्या मदतीने स्पर्म सरळ एगच्या जवळ गर्भाशयामध्ये टाकले जातात. जेव्हा औषधे घेऊन आणि ओव्युलेशनच्या वेळेवर सेक्स करूनदेखील स्त्री गरोदर राहू शकत नाही तेव्हा सर्वात आधी आययूआयची मदत घेतली जाते. जर स्पर्म काउंट वा त्यांच्या गतिशीलतेमध्ये कमतरता निर्माण होणे किंवा एंडोमेट्रियोसिसची स्थिती निर्माण होते तेव्हा आययूआय करण्याचा सल्ला दिला जातो.

काही पुरुषांच्या वीर्यात दोष आढळून येतात. शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी असणे. शुक्राणूंची मंद गती किंवा हालचाल, शुक्राणूंच्या रचनेतील विविध दोष किंवा तीनही दोष एकत्रित असणे. अशा वेळी शुक्राणू असून, आयव्हीएफ होऊ शकत नाही; कारण वरीलपैकी कोणत्याही प्रकारात क्षमता नसते. पण अडथळे असले, की पर्याय सापडतात. यातूनच 'आयसीएसआय'चा जन्म झाला.

स्त्रियांच्या बीजांडकोष किंवा अंडनलिकेत काही अडथळा असून नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी समस्या येते. अशा महिलांसाठी आयव्हीएफ उपयुक्त आहे. केवळ मूल होणे इतपत हा उपचार सीमीत नसून त्यामुळे संबंधित महिलेला कुटुंबात, समाजात पुन्हा मानाचे स्थान मिळते. स्त्रियांना मूल होत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. वेदनादायी उपचारांना सामोरं जावं लागते. आजूबाजूच्या विखारी नजरांचा सामनाही करावा लागतो. मूल होो हे फक्त स्त्री वरच अवलंबून आहे, असा आविर्भाव असतो. लग्नानंतर लगेचच मूल झालं नाही तर तिलाच दोषी धरलं जातं; पण त्या आधी त्याच्या तपासण्या होणेही गरजेचे आहे. त्याच्या मध्येही दोष असू शकतो हे समजून घ्यायला हवं. म्हणूनच लग्नानंतर मुलीची तपासणी केली जाते, तशा मुलाच्या ही तपासण्या व्हायला हव्यात. वंध्यत्वामध्ये ३० ते ३५ टक्के पुरूषही जबाबदार असतो. रोजचा आहार, पुरूषांचे व्यसन ही पुरूषांमधील वंध्यत्वाला कारणीभूत असते. रक्त तपासणी, हार्मोन्स टेस्ट, पुरुषांची वीर्य चाचणीद्वारे पुरूषबीजांची संख्या तपासली जाते.

प्रवास, दगदग, सध्या च्या काळातील स्त्री-पुरुषांमधील कामामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, बदललेला आहार यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर नकळत फार ताण पडत असतो. परिस्थिती कशीही असली तरी स्त्रीला परिवाराची साथ असेल तर ती सगळे दिव्य पार करते. केवळ जगणं म्हणजे जीवन नाही तर, आपल्यातील क्षमतांचा विकास करून स्वत:बरोबरच समाजोन्नती साधणं म्हणजे खरं जीवन होय. अनेक कुटुंबांच्या आयुष्यात या तंत्रज्ञानाद्वारे नंदनवन फुलले आहे.

- डॉ. नमिता मोकाशी-भालेराव.

Web Title: IVF technology: the joy of motherhood;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.