शिवकालीन मर्दानी खेळांचा जागर
By admin | Published: February 16, 2017 03:28 AM2017-02-16T03:28:04+5:302017-02-16T03:28:04+5:30
महापालिकेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत शनिवारवाड्याच्या प्रांगणात रणमर्दांच्या आणि रणरागिणींच्या चित्तथरारक आवेशपूर्ण प्रात्यक्षिकांनी
पुणे : महापालिकेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत शनिवारवाड्याच्या प्रांगणात रणमर्दांच्या आणि रणरागिणींच्या चित्तथरारक आवेशपूर्ण प्रात्यक्षिकांनी शिवकालीन मर्दानी खेळांचा जागर झाला.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे, तसेच शस्त्रांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, परिमंडळ एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, प्रवीण परदेशी, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यात सहभागी झालेले आखाडे : गोगटे क्लब नारायण पेठ मर्दानी खेळ संघ (कुंडलिक कचाले), शिवाजीराजे मर्दानी आखाडा (विजय आयवळे), नरवीर तानाजी मालुसरे (रामदास सोनावणे), लहुजी मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी आॅफ महाराष्ट्र, हडपसर (दीपक फासगे), त्र्यंब्यकेश्वर प्रतिष्ठान (विनोद आढाव), तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था, काळेवाडी पिंपरी चिंचवड (रवीद्र जगदाळे), शिवसंस्कार प्रतिष्ठान कोल्हापूर (प्रा. राजेश पाटील), सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था कोल्हापूर (लखन जाधव), रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर (संदीप लाड), शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर (सूरज ढोली), न्यू छत्रपती ब्रिगेड कोल्हापूर (संदीप साळोखे).
हलगीवादक टीम : कोल्हापूर (सागर साठे), मर्दानी राजा (सुहास ठोंबरे आखाडा), कोल्हापूर (मिलिंद सावंत), शिवगर्जना मर्दानी आखाडा कोल्हापूर (संदीप पंडितराव सावंत), श्री छावा युवा मंच, अतित, सातारा (उदय उत्तम यादव), साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळ, वाटेगाव, जि. सांगली (सुरेश तुकाराम साठे), रावळबंधू-रावळ आखाडा, संगमनेर, जि. अहमदनगर (दीपक मदन रावळ). (प्रतिनिधी)