पुरंदरमध्ये उभारणार गुळ कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:13+5:302020-12-07T04:08:13+5:30
भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याचप्रमाणे ...
भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार देण्यासाठी लवकरच गुळ कारखाना उभारणार असल्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्या वतीने सॅनिटाईझर स्टॅडचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे,पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते,माजी सरपंच एकनाथ तात्या यादव,माजी उपसरपंच माऊली यादव, राजुरीचे सरपंच उद्धव भगत.पोंढेचे सरपंच संपत वाघले , बाळासो कड , नितीन वायकर ,पिंपरीचे उपसरपंच विश्वास थेऊरकर ,नंदकुमार सागर ,पिसर्वेचे व्हा. चेरमण मच्छिंद्र कोलते उपस्थित होते.
आमदार संजय जगताप म्हणाले की, पुरंदर उपसा जलसिंचन योजना पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असल्यामुळे या भागांमध्ये दिवसेंदिवस बागायती क्षेत्र वाढत आहे त्याचबरोबर या भागांमध्ये दुग्ध व्यवसाय वाढून पशुधन वाढत आहे म्हणून या भागातील दुग्ध व्यवसायिकांनी व शेतक-यांनी केलेल्या मागणीनुसार या भागात लवकरात लवकर पशुधनासाठी एक दवाखाना उभारला जाईल व त्याचबरोबर येत्या मार्चपर्यंत पशुधनासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले.
सूञसंचालन माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विवेक अबनावे तर आभार माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी मानले .
फोटो
०६ भुलेश्वर
माळशिरस येथे आरोग्य केंद्रास सॅनिटाईझर स्टॅड देताना पुरंदरचे आमदार संजय जगताप व इतर