सात वर्षाच्या जय नहारचा डेंगीने मृत्यू; आळंदीतील अस्वच्छतेमुळे डासांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:42 PM2017-10-30T13:42:38+5:302017-10-30T13:44:55+5:30

मरकळ (ता. खेड) येथे सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला. व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता.

Jai Nahar dies of seven years due to dengue; Increase in mosquitoes in Alandi | सात वर्षाच्या जय नहारचा डेंगीने मृत्यू; आळंदीतील अस्वच्छतेमुळे डासांमध्ये वाढ

सात वर्षाच्या जय नहारचा डेंगीने मृत्यू; आळंदीतील अस्वच्छतेमुळे डासांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्देआळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा वाढला प्रादुर्भावआळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ

शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) येथे अवघ्या सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला.
आळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात अनेक जण डेंगी आणि डेंगीसदृष आजाराने त्रस्त आहेत. मरकळ येथील प्रसिद्ध व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता. ताप आला म्हणून त्याला भोसरी येथील लहान मुलांच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या ६६ हजार होती. तेथील उपचाराने जयच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने नातेवाईकांनी वाकड येथील दुसर्‍या खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या अवघी बत्तीस हजार झाली होती. मात्र त्यानंतर रक्तदाब कमी झाल्याने जयची प्रकृती अधिक खालावून त्याचा मृत्यू झाला. 
दरम्यान आळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंगी, मलेरिया सारख्या तापाच्या आजाराने रूग्णांची संख्या बळावली होती. आळंदीत तर डेंगी आणि डेंगीसदृश तापाच्या रूग्णांची संख्या गेली दोन महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील खासगी दवाखाने आणि रूग्णालयातही उपचारासाठी येणार्‍या रूग्णांची संख्या वाढली आहे.

Web Title: Jai Nahar dies of seven years due to dengue; Increase in mosquitoes in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.