Video: प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला केशव शंखनाद पथकाला निमंत्रण, पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 03:12 PM2023-12-24T15:12:14+5:302023-12-24T15:13:50+5:30
केशव शंखनाद पथकात १११ वादक असून, ९० टक्के महिलांचा समावेश
शगुप्ता शेख
पुणे: आयोध्या येथे २२ जानेवारी प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी पुण्यातील केशव शंखनाद पथकाला राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमाच्यासाठी शंखनाद करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
याबाबतचा पत्र श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चम्पत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना दिलं आहे. ही बाब पुण्याच्यासाठी खूपच अभिमानाची बाब मानली जात आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 18 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. एकीकडे श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र हे खास पुण्यात बनत आहे तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहे.
याबाबत पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील मंदिरांमध्ये तसेच धार्मिक आणि गणेश मंडळाच्या मिरवणुकीत केशव शंखनाद पथकाच्या माध्यमातून शंखनाद वादन करण्यात येत आहे. या पथकात जवळपास साडे पाचशे हून अधिक वादक असून यात 90 टक्के वादक महिला आहेत. विशेष म्हणजे यात 5 वर्षापासून ते 85 वर्षापर्यंतचे वादक असून प्रत्येक जण यात विविध कार्यक्रमात वादन करत असतो.जेव्हा आम्हाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्यासाठी निमंत्रण आलं तेव्हा खूपच आनंद झालं. आणि राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला पथकातील 111 वादक हे 18 जानेवारीला जाणार आहे. आणि तिथं जाऊन शंखनाद करणार आहे. या 111 जणांमध्ये 5 वर्षापासून ते 85 वर्षाच्या ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.