जयदीप तावरे यांच्या अटकेच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:48+5:302021-07-09T04:08:48+5:30

नागरिकांचा प्रतिसाद : अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लाेकमत न्यूज नेटवर्क माळेगाव : राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप ...

Jaideep Taware's arrest | जयदीप तावरे यांच्या अटकेच्या

जयदीप तावरे यांच्या अटकेच्या

Next

नागरिकांचा प्रतिसाद : अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

माळेगाव : राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांच्या अटकेच्या विरोधात माळेगाव येथे जनता रस्त्यावर उतरली आहे. या वेळी जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ८) माळेगाव येथे पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गोळीबार प्रकरणी रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात जयदीप तावरे समर्थकांनी माळेगाव बंदसह निषेध सभा आयोजित केली होती. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाजी चौकात निषेध सभा झाली. या वेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी संतोष जगताप म्हणाले, माळेगाव नगरपंचायत होण्यापूर्वी प्रशासनकाळात अधिकाऱ्याशी संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तर सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी लोणकर यांनी रविराज तावरे व रोहिणी तावरेंवर हल्ला चढवत अंगणवाडीसेविका भरतीत पात्र असलेल्या महिलेला डावलून मर्जीतील महिलेची निवड केली. शालेय पोषण आहार योजनेत मनमानी करत परित्यक्ता महिलेऐवजी ठेकेदारास वाटप करण्यासाठी नेमल्याचा आरोप केला. माजी सरपंच दिलीप शिवाजीराव तावरे म्हणाले की माझ्या मुलाचा गोळीबार प्रकरणात केसभर देखील सहभाग असला तर त्यास गाववेशीवर फासावर लटकावे असे सांगून त्यांना अश्रू अनावर झाले.

या वेळी दादा जराड, राजेंद्र तावरे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जयदीप तावरे यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. दत्तात्रय येळे, दीपक तावरे, बंटी तावरे, प्रदीप तावरे, शिवराज राजेजाधवराव यांच्यासह पणदरे, धुमाळवाडी, नीरा वागज येथील युवक सहभागी झाले होते. या वेळी समर्थकांनी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन दिले. या निषेध सभेत हजारो युवक उपस्थित होते. या सभेत जयदीप तावरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.

पोलिसांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा

माळेगावमध्ये रविराज तावरे यांच्यावर झालेला गोळीबार निंदनिय आहे. या प्रकरणी सबंधितांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कोणाचेच दुमत नव्हते. परंतु राजकिय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याचा दावा करीत दिपक तावरे यांनी या प्रकरणी पोलिसांनी नि:पक्षपातीपणे गोळीबार प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली.

कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही

माळेगाव गोळीबार प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहे, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.

...राजकीय आकसापोटी खोटा जबाब

रविराज तावरे यांनी गाळीबार प्रकरणात राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्या विरुद्ध खोटा जबाब दिला आहे. त्या घटनेची शहानिशा न करता पोलिसांनी जयदीप यांच्याविरुद्ध केलेली पोलिस कारवाई अन्यायकारक असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती धनवान वदक यांनी निषेध सभेत व्यक्त केले.

सभेची वैशिष्ट्ये

१) जयदीप तावरे नावाच्या टोप्या परिधान केलेले युवक,मी जयदीप तावरे मला अटक करा असे बॅनर लक्ष वेधून घेत होते.

२) अनेक वक्त्यांनी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे यांनी पदाचा वापर करून कसा गैरव्यवहार केला याचा पाढाच वाचून दाखविला.

३) रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर कुणी ही निषेध व्यक्त केलानव्हता.मात्र जयदीप तावरेसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने गावात वेगळीच चर्चा होती.

———————————————————

फोटो ओळी- पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देताना जयदीप तावरे समर्थक.

०८०७२०२१ बारामती—०३

——————————————————

फोटोओळी—माळेगांव चे माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांच्या अटकेच्या विरोधात माळेगांव येथे बंद पाळण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

०८०७२०२१ बारामती ०२

Web Title: Jaideep Taware's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.