जिल्ह्यातील १३३ तलावांतून गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:42 AM2017-07-29T05:42:54+5:302017-07-29T05:42:54+5:30

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनींवर गाळ अस्तरीकरण सुरू असून, १३३ पाझर तलावामधून गाळ काढण्यात आला आहे

jailahayaataila-133-talaavaantauuna-gaala-kaadhalaa | जिल्ह्यातील १३३ तलावांतून गाळ काढला

जिल्ह्यातील १३३ तलावांतून गाळ काढला

Next

पुणे : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनींवर गाळ अस्तरीकरण सुरू असून, १३३ पाझर तलावामधून गाळ काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील १३३ पाझर तलावामधून सुमारे १६६.८० हेक्टरवर गाळ पसरविण्यात आला आहे. लोकसहभागातून सुमारे ४८ लाखांची कामे पूर्ण केली आहेत.
शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती तालुक्यांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन गाळयुक्त शिवाराला प्राधान्य दिले होते. त्यामुळे मागील काही महिन्यात गाळ अस्तरीकरणाद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा झाला आहे. लोकसहभागातून आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक मदतीद्वारे पाझर तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या जमिनींवर पसरविण्यात येत आहे. त्यामुळे पाझर रूंदीकरण आणि शेतकºयांच्या जमिनीचा पोत वाढण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावांची साठवण क्षमता वाढण्यासाठी आणि शेतकºयांच्या जमिनींवर गाळाचे अस्तरीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेद्वारे शासनाच्यावतीने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकºयांना परवानगी दिली होती.
पावसाचे पाणी पाझर तलावात साचल्यास त्याचा शेतकºयांना फायदा होत आहे. तसेच उत्पदनातही वाढ होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढून तलावांची पाणी क्षमता वाढविणे आणि शेतकºयांच्या जमीनींवर गाळ पसरल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होणे अशा दुहेरी फायद्यामुळे योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे ६० टक्के कामांची पुर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे तलावांमध्ये पावसाचे पाणी साठवणुकीची क्षमता वाढली आहे.

Web Title: jailahayaataila-133-talaavaantauuna-gaala-kaadhalaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.