जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:34 AM2017-07-30T03:34:16+5:302017-07-30T03:34:25+5:30

जिल्ह्यातील २५ धरणांपैकी प्रमुख मोठी अकरा धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

jailahayaataila-akaraa-dharanae-bharalai | जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

Next

पुणे : जिल्ह्यातील २५ धरणांपैकी प्रमुख मोठी अकरा धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि खडकवासला आणि वीर यापैकी काही धरणे भरली, तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. सध्या पाऊस ओसरला असला, तरी धरण साखळीत पाण्याचा ओघ सुरूच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर एकूण २३.६९ टीएमसी म्हणजेच, ८१.२६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला २४ टक्के, तर जवळपास सात टीएमसी पाणीसाठा अधिकचा झाला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे धरण परिसरात डोंगर, दºयांमधून पाणी चांगल्या प्रमाणात येत आहे. विशेषत: मागील आठवड्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने मोठी वाढ झाली. यामुळे आजअखेर जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.
सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी चांगला पाणीसाठा झाल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या खडकवासला आणि पानशेत धरण शंभर टक्के भरले आहे, तर वरसगाव धरणाचा पाणीसाठा ७२.८४ टक्क्यावर गेला आहे. टेमघर धरण ५२.५१ टक्के भरले आहे.
जिल्ह्याातील बहुतेक धरण परिसरात मागील चार दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. टेमघर धरणाच्या परिसरात केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि खडकवासला आणि वीर यापैकी काही धरणे भरली, तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत.

कुकडी प्रकल्पातील तीन धरणे भरण्याच्या मार्गावर
कुकडी प्रकल्पातील प्रमुख धरणांपैकी येडगाव (८७.८५ टक्के), डिंभे (९१.०१ टक्के), तर घोड (८२.३७ टक्के) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत, तर माणिकडोह (५२.४२ टक्के) आणि वडज (७१.७३ टक्के) या धरणांत निम्म्याच्यावर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर पिंपळजोगा धरण परिसरात पावसाने ओढ दिल्याने अद्याप निम्म्यापेक्षा (३५.०७ टक्के) इतका कमी पाणीसाठा आहे.

उजनी धरणात ४१.७५ टक्के पाणीसाठा
उजनी धरण परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे; मात्र खडकवासला प्रकल्पातील धरण साखळी परिसरात मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या उजनी धरणात ४१.७५ टक्के इतका म्हणजे २२.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांबरोबर आणि शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने होतो.

डिंभे धरणात ९१ टक्के पाणीसाठा
डिंभे धरणाची पाणीपातळी आजमितीस ७१७.२५० एवढी झाली असून, धरणात ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊ लागल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी धरणाच्या तीन दरवाजांतून, तर काल शुक्रवारी रात्री पासून पाचही दरवाजांमधून पाणी सोडण्यात येते होते. शनिवारी दुपारी तीन वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. केवळ पॉवर हाऊसमधून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात केवळ ४४ टक्के एवढाच पाणीसाठा झाला होता. यंदा आजच्या तारखेपर्यंत धरण पाणलोटक्षेत्रात ८३६ मीमिएवढा पाऊस झाला आहे. गरज पडल्यास पुन्हा कोणत्याही क्षणी धरणातू विसर्ग सुरू केला जाणार आहे.

Web Title: jailahayaataila-akaraa-dharanae-bharalai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.