जैन संतांचा दया, क्षमा, शांतीचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:47+5:302021-07-24T04:09:47+5:30
त्यांच्या प्रमुख प्रवचनाने चातुर्मासाची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तशातच ...
त्यांच्या प्रमुख प्रवचनाने चातुर्मासाची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तशातच मुसळधार पावसामुळे भाविकांनी ऑनलाईन प्रवचनांना पसंती दिली. मंदिरमार्ग आणि स्थानकवासी अशा दोन्ही पंथांच्या बांधवांनी मंदिर आणि स्थानकांमध्ये ऑनलाईनसाठी आवश्यक ती तयारी केली होती. पावसाळ्यात ज्याप्रमाणे धरतीची मशागत करून पीक घेतले जाते त्याप्रमाणे मनाची मशागत चातुर्मासात करून कर्मक्षय करा आणि जन्म, मरणाच्या फेऱ्यातुन मुक्त व्हा, असे आवाहन साधू, साध्वीजींनी आपल्या प्रवचनात केले.
चातुर्मासिक, चौदसनिमित्त अनेक भाविकांनी कडक उपवास करीत कर्मक्षयाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. चातुर्मासार्थ दैनंदिन प्रार्थना, प्रवचन, मांगलिक, प्रतिक्रमण अशा विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जैन स्थानक आणि मंदिरांच्या संघप्रमुखांनी भाविकांनी केले.