जयपूरचा अतुल अगरवाल सीए परीक्षेत देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:45 AM2018-07-21T01:45:43+5:302018-07-21T01:45:46+5:30
दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंन्टस आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापालच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
पुणे : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंन्टस आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापालच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जयपूर येथील अतुल अगरवाल ७७.२५ टक्के गुणांसह देशात प्रथम आला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार २४३ विद्यार्थी सीएसाठी पात्र ठरले आहेत.
जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत अतुल अगरवालने ८०० पैकी ६१८ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर अहमदाबादचा आगम संदीपभाई दलाल (७६.८८ टक्के) हा दुसरा आणि सुरत येथील अनुराग बगारिया (७४.६३) हा तिसरा आला.
नवीन अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत सुरत येथील प्रीत शहा ६७.७५ टक्के गुणांसह देशात प्रथम तर बंगळुरू येथील अभिषेक नागराज (६७.३८ टक्के) व समीक्षा अगरवाल (६५.५० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. ही परीक्षा दिलेल्या ५ हजार ४०६ विद्यार्थ्यांपैकी १३९ विद्यार्थी सीएसाठी पात्र ठरले आहेत.
>सीएच्या फाउंडेशन परीक्षेमध्ये दिल्ली येथील स्वाती (८३ टक्के), रायपूर येथील आयुष अगरवाल (८२.७५ टक्के) व हल्दवाणी येथील स्वलेहा साजीद (८१.७५ टक्के) यांना अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.