मेघकडून जेम्स पराभूत

By admin | Published: June 1, 2017 02:35 AM2017-06-01T02:35:18+5:302017-06-01T02:35:18+5:30

भारताच्या मेघ भार्गव पटेलने मुलांच्या एकेरीत जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा पराभव करून १८ वर्षांखालील

James defeats from cloud | मेघकडून जेम्स पराभूत

मेघकडून जेम्स पराभूत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताच्या मेघ भार्गव पटेलने मुलांच्या एकेरीत जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा पराभव करून १८ वर्षांखालील आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे सिद्धांत बांठिया व महक जैन यांसह दिग्विजय सिंग, सालसा आहेर, वैदेही चौधरी, मिहिका यादव या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कुल आॅफ टेनिसच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात जागतिक क्र. ५१६ असलेल्या भारताच्या मेघ भार्गव पटेल याने जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा २-६, ७-५, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित व भारताच्या सिद्धांत बांठिया याने आपली विजयी मालिका कायम ठेवत थायलंडच्या अकनीत पमजीतचा ६-२, ७-५ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तैपेईच्या हो रे याने जपानच्या व पाचव्या मानांकित सेइता वात्नाबीचा ६-३, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. भारताच्या दिग्विजय सिंग याने थायलंडच्या व आठव्या मानांकित पलाफूम कोवापिटुकटेडचा ६-४, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली. चीन क्रिस्टियन्स दिदिअर याने जपानच्या व चौथ्या मानांकित रियुकी मत्सुदावर ७-५, ६-१ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात अव्वल मानांकित व भारताच्या महक जैन हिने जपानच्या सकुरा होसोगीचे आव्हान ६-०, ६-२ असे मोडीत काढले. जपानच्या मना कवामुरा हिने भारताच्या व तिसऱ्या मानांकित आकांक्षा भानला ६-१, ६-३ असे नमविले. जपानच्या फुना कोझाकी हीने आठव्या मानांकित
व भारताच्या रिया वर्माचा ६-३,
६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

Web Title: James defeats from cloud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.