जामखेड - स्वारगेट एसटी रस्त्यावरुन खाली घसरली; सुदैवाने प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:55 PM2021-01-17T12:55:17+5:302021-01-17T13:22:32+5:30

दौंड-पाटस रोडवर अष्टविनायक रस्त्याचे काम चालू असल्याने एकेरी मार्ग चालू आहे.

Jamkhed - Swargate ST. Slipped down the street; Luckily the passengers survived |  जामखेड - स्वारगेट एसटी रस्त्यावरुन खाली घसरली; सुदैवाने प्रवाशी बचावले

 जामखेड - स्वारगेट एसटी रस्त्यावरुन खाली घसरली; सुदैवाने प्रवाशी बचावले

googlenewsNext

दौंड: गिरीम ( ता. दौंड )  परिसरात जामखेड - स्वारगेट एसटी रस्त्यावरुन खाली घसरली. सुदैवाने एस .टी. विजेच्या खांबाला अडकल्याने पुढील अनर्थ टळला यात कुठलाही प्रवाशी जखमी झाला नाही .अन्यथा एसटीमधील सुमारे साठ प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता.

दौंड-पाटस रोडवर अष्टविनायक रस्त्याचे काम चालू असल्याने एकेरी मार्ग चालू आहे. तेव्हा दौंड दिशेकडून पुण्याला जाणारी एसटी भरधाव वेगात होती. तर एका ट्रकला एसटी ओव्हरटेक करीत असतांना एस टी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुरुमवरुन खाली घसरुन कलटी झाली. यावेळी एस टी बस विद्युत खांबात अडकली जर विद्युत खांब नसता तर एसटी जागीच पलटी झाली असती.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार एसटी प्रवाशांनी भरलेली होती आणि जोरात मार्गक्रमण करीत होती. एसटी एका बाजुला पूर्ण कलल्याने प्रवाशी घाबरलेले होते. यावेळी त्यांना खाली उतरवण्यात आले. मात्र उशीरापर्यंत दुसरी बस आली नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या एकाबाजुला सामान घेऊन ताटकळत बसावे लागले.

Web Title: Jamkhed - Swargate ST. Slipped down the street; Luckily the passengers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.