जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवीचा डबल धमाका

By admin | Published: June 30, 2017 04:01 AM2017-06-30T04:01:25+5:302017-06-30T04:01:25+5:30

जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवी कानिटकरने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

Janahvi double explosion in district badminton tournament | जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवीचा डबल धमाका

जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवीचा डबल धमाका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवी कानिटकरने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. एकेरी प्रकारामध्येही तिनेच बाजी मारली होती.
मॉडर्न (पीडीएमबीए) क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी प्रकारात झालेल्या अंतिम फेरीत जान्हवी आणि अनन्या फडके या अव्वल मानांकित जोडीने पुजा देशपांडे आणि रिया हब्बू या तिसऱ्या मानांकित जोडीचा २१-१०, २१-१५ने सहज पराभव केला. ही लढत जान्हवी-अनन्या जोडीने २५ मिनिटांत जिंकली.
इतर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :
१९ वर्षांखालील मुले : एकेरी : सोहम नावंदर विवि पार्थ देशपांडे २२-२०, २१-१०. वृषभ देशपांडे विवि यश शाह २१-१७, २१-१६.
१७ वर्षांखालील मुले : एकेरी : वरूण कपूर विवि सस्मित पटेल २१-११, २१-१५. प्रथमेश हळणकर विवि व्यंकटेश अग्रवाल २२-२०, १३-२१, २१-१५. प्रतीक धर्माधिकारी विवि केदार भिडे २१-१३, २१-१५. यश शाह विवि विक्राम दाते २१-७, २१-१६.
१७ वर्षांखालील मुली : एकेरी : अनन्या फडके विवि तनिष्का देशपांडे २१-५, १६-२१, २३-२१. तारा शाह विवि जान्हवी कानिटकर २१-२३, २१-१६, १-१५. रिया कुंजीर विवि अदिती महाजन २१-१५, १७-२१, २१-१०. सनश्री देशपांडे विवि गार्गी दतेंडुलकर २१-९, २१-१४.
मिश्र दुहेरी : समीर भागवत-मानसी गाडगीळ विवि कुणाल गोळे-केतकी केळकर २१-१२, २१-१२. विनीत कांबळे-आदिती काळे विवि ऋषीकेश खाडिलकर-उन्नती मुणोत २१-१३, २१-५. नरेंद्र गोगावले-राधिका
विवि सचिन मानकर-मनाली कुलकर्णी २१-११, २१-१४. अभिषेक कुलकर्णी-संयोगिता घोरपडे विवि ऋतुराज देशपांडे-नुपूर सहस्त्रबुद्धे
२१-१३, २१-१४.

Web Title: Janahvi double explosion in district badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.