जान्हवी, संजना, सोहिनी उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:28+5:302021-03-19T04:10:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षांखालील राष्ट्रीय ...

Janhvi, Sanjana, Sohini in the semifinals | जान्हवी, संजना, सोहिनी उपांत्य फेरीत

जान्हवी, संजना, सोहिनी उपांत्य फेरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या सोहिनी मोहंती, कर्नाटकाच्या टी साई जान्हवी व संजना देवीनेनी यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या बिगरमानांकीत सोहिनी मोहंतीने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित तेलंगणाच्या कनूमुरी इकराजूचा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या सातव्या मानांकित संजना देवीनेनी हिने चौथ्या मानांकित उत्तराखंडच्या सौमित्रा वर्माचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकाच्या टी. साई जान्हवी हिने दहाव्या मानांकित तेलंगणाच्या लक्ष्मी दांडूचा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने आपलीच राज्य सहकारी ऐश्वर्या जाधवचा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या सहाव्या मानांकित वेंकट बटलंकीचा तर तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या तेजस आहुजाने मणिपूरच्या सातव्या मानांकित सेंजम अश्वजीतचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीने महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरचा टायब्रेकमध्ये तीन सेटमध्ये पराभव केला. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर व वेदांत भसीन या जोडीने चौथ्या मानांकित अंतरिक्ष तमुली व अश्वजित सेंजम या जोडीवर सनसनाटी विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपूर्व (मुख्य ड्रॉ) फेरी :

मुले :

प्रणव रेथीन आरएस, तामिळनाडू (१) वि.वि. वेंकट बटलंकी, तेलंगणा (६) ६-२, ६-०,

तेजस आहुजा, हरियाणा (३) वि.वि. सेंजम अश्वजीत, मणिपूर (७) ६-३, ६-४,

महालिंगम खांदवेल, तामिळनाडू, (५) वि.वि. श्री प्रणव तम्मा, तेलंगणा ६-१, ६-२,

क्रिश त्यागी, कर्नाटक, (२) वि.वि. अर्णव पापरकर, महाराष्ट्र २-६, ७-६ (५), ६-०,

मुली :

आस्मि आडकर, वि. ऐश्वर्या जाधव ६-१, ६-४,

टी साई जान्हवी, कर्नाटक वि.वि. लक्ष्मी दांडू, तेलंगणा (१०) ६-३, ६-४,

संजना देवीनेनी, कर्नाटक, (७) वि.वि. सौमित्रा वर्मा, उत्तराखंड, (४) ६-४, ६-१,

सोहिनी मोहंती, ओरिसा वि.वि. कनूमुरी इकराजू, तेलंगणा (६) ६-४, ६-३,

दुहेरी गट : उपांत्यपूर्व फेरी :

मुले :

प्रणव रेथीन आरएस-साम्प्रीत शर्मा (१) वि.वि. रूरिक रजनी-व्रज गोहिल ४-१, ५-३,

अर्णव पापरकर-वेदांत भसीन वि.वि. अंतरिक्ष तमुली-अश्वजित सेंजम (४) ४-५, ५-४, १०-६,

तेजस आहुजा-सिद्धांत शर्मा (३) वि.वि. शुभम शेरावत-अर्जुन पंडित ४-०, ४-२,

वेंकट बटलंकी-क्रिश त्यागी (२) वि.वि. हितेश चौहान-अक्षत धूल ४-२, ४-०,

मुली :

रिशीता बासिरेड्डी-टी साई जान्हवी वि.वि. साईजयानी बॅनर्जी- वामिका शर्मा ४-१, ५-४ (५),

मानसी सिंग-सोहिनी मोहंती वि.वि. वरलिका श्री-लक्ष्मी दांडू १-४, ४-२, १०-५,

कनूमुरी इकराजू-ऐश्वर्या जाधव वि.वि. संजना देवीनेनी-सर्वा किलारू (३) ५-४ (०), ४-१,

प्रार्थना सोळंकी-प्रियांका राणा वि.वि. माहिका खन्ना-शगुन कुमारी ५-४ (३), ४-१.

Web Title: Janhvi, Sanjana, Sohini in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.