जॅमर चोरताय... थांबा, होऊ शकतो ३ वर्षे तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 02:50 AM2018-12-16T02:50:05+5:302018-12-16T02:50:15+5:30
नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास कारवाई : मात्र, वाहनचालक जॅमरसह जातात पळून
पुणे : नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यांवर किंवा वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्याने वाहनांना जॅमर लावले जात आहे. मात्र, सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे जॅमर चोरीच्या गेल्या वर्षभरात अनेक घटना घटल्याची माहिती समोर आली आहे, असा गुन्हा करणाऱ्यास कायद्यानुसार तीन वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकते.
शहरातील वाहतूक प्रश्न वाढतच चालल्याने कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. नियम तोडल्यास वाहन चालकांना दंड करून सोडून देण्यात येते. तर वाहने नो पार्किंगमध्ये लावली असतील तर दुचाकी टोर्इंगद्वारे संबंधित पोलीस स्टेशनला नेण्यात येतात. चारचाकी वाहन असेल तर तिला जागेवरच जॅमर लावून लॉक केले जाते. मात्र, बेशिस्त वाहनचालक नो पार्किंगचा दंड टळावा म्हणून जॅमर लावलेले चाक खोलून त्या जागी स्टेपनी लावून फरार होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, हे सर्व करीत असताना २०० रुपयांचा दंड टाळण्यासाठी ते जॅमर चोरीसारखा गंभीर गुन्हा करीत आहेत. असा प्रकार उघड झाल्यास पोलीस संबंधित वाहन चालकांवर भारतींय दंड संविधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करीत आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तीन वर्षे तुरुंगवास होवू शकतो.
असा चोरला जातोय जॅमर
जॅमर लावल्याने गाडी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहन चालक जॅमर लावलेला टायर बदली करून त्या जागी स्टेपनी बसवतात. तसेच गाडी पुढे घेतली तर जॅमरवर लोड येऊन तो वाकला जातो. वाकलेले जॅमर अलगद काढता येतो.
एका जॅमरची किंमत एक हजार रुपये
च्टोर्इंग व्हॅनवरील जॅमर चोरीला गेल्याने त्यांची संख्याही कमी झाली आहे. एका जॅमरची किंमत साधारण १ हजार रुपये असते.
च्तो चोरीला गेल्याने पोलिसांना दंडही वसूल करता येत नाही. त्यामुळे जॅमर चोरी आणि दंड न मिळाल्याचा दुहेरी फटका पोलिसांना बसत आहे.
जॅमर चोरणाºया वाहनचालकांवर चोरीचा गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी स्वत:ला गुन्हेगार बनवायचे का, याचा विचार अशा बाबी करणाºया व्यक्तींनी करावा. त्यातील अनेकांना तर माहिती पण नसते की आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे.
- तेजस्वी सातपुते, उपायुक्त वाहतूक शाखा