पुण्यात उभारणार ‘जेएटीएफ’चे अद्ययावत हॉस्टेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:43+5:302021-02-25T04:11:43+5:30

‘जेएटीएफ’चे रेस्ट ऑफ महाराष्ट्र चेअरमन इंदर जैन, कव्हेनियर राहुल सांकला, को-कव्हेनियर संजय डागा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

JATF's state-of-the-art hostel to be set up in Pune | पुण्यात उभारणार ‘जेएटीएफ’चे अद्ययावत हॉस्टेल

पुण्यात उभारणार ‘जेएटीएफ’चे अद्ययावत हॉस्टेल

Next

‘जेएटीएफ’चे रेस्ट ऑफ महाराष्ट्र चेअरमन इंदर जैन, कव्हेनियर राहुल सांकला, को-कव्हेनियर संजय डागा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ‘जेएटीएफ’चे चेअरमन हेमंत जैन, अध्यक्ष अनिल जैन, चीफ सेक्रेटरी ललित डांगी, ‘जितो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, रेस्ट ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, पुणे शहर अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांची उपस्थिती होती.

या वेळी पुण्यातील खराडी भागात पुढील काही दिवसांत ‘जेएटीएफ’चे एक भव्य हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच ‘जेएटीएफ’चे सभासद वाढविणे आणि दरवर्षी देशभरातून १०० विद्यार्थी अधिकारी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. सध्या देशभरात ‘जेएटीएफ’ची पाच हॉस्टेल आहेत. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘जेएटीएफ’मधून शिक्षण घेतले आहे. सध्या सुमारे ६०० विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

या कार्यक्रमाला ॲड. एस. के. जैन, अचल जैन, राजेश सांकला, रवींद्र सांकला, इंदर छाजेड, अजय मेहता, राजेंद्र जैन, शर्मिला ओसवाल, अमित लुंकड, विशाल चोरडिया, पंकज कर्णावट, चेतन भंडारी, संदीप लुणावत आदी उपस्थित होते.

Web Title: JATF's state-of-the-art hostel to be set up in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.