कांस्य पदक मिळवूनही जावेद चाैधरी व्हिलचेअरच्या प्रतिक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:28 PM2018-12-08T18:28:25+5:302018-12-08T18:30:27+5:30
व्हिलचेअर बास्टेकबाॅल खेळणाऱ्या जावेद चाैधरीने अनेक पदके पटकावूनही त्याच्याकडे स्वतःची स्पार्टस व्हिलचेअर नसल्याने ताे मदतीच्या प्रतिक्षेत अाहे.
पुणे : काही महिन्यांपूर्वी एका तरुणाचा एका पायावर नाचतानाचा व्हिडीअाे साेशल मिडीयावर व्हायरला झाला हाेता. साेशल मिडीयावर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. अनेकांनी त्याला शुभेच्छांबराेबरच त्याच्या तळमळीचे काैतुक केले हाेते. सध्या हाच तरुण बास्टेकबाॅल टुर्नामेंटसाठी लागणाऱ्या अारजीएस स्पाेर्टस चेअरसाठी मदतीच्या प्रतिक्षेत अाहे. त्याने महाराष्ट्राच्या संघाला नॅशनल टुर्नामेंटमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले परंतु त्याला स्पाेर्टस व्हिलचेअरसाठी झगडा करावा लागत अाहे.
मूळचा बुलडाण्याचा असलेल्या जावेद चाैधरीला एका अपघातात पाय गमवावा लागला. अभ्यासात अाणि खेळात हुशार असलेल्या जावेदच्या अायुष्यात अालेल्या या संकटाने त्याचा पाय जरी माेडला असला तरी त्याच्या अात्मविश्वासाला कुठेही तडा गेला नाही. जावेद व्हिलचेअर वरील बास्टेकबाॅल खेळायला लागला. नियतीने दिलेल्या संकटापुढे न झुकता ताे पहाडासारखा उभा राहिला. अात्तापर्यंत त्याने अनेक राज्य स्तरावरील, राष्ट्रीय स्तरावरील तसेच अांतरराष्ट्रीय स्तरावरील टुर्नामेंट्स खेळून भारताला अनेक पदके मिळवून दिली अाहेत. नुकताच 26 नाेव्हेंबर राेजी लेबनाॅनमध्ये झालेल्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देण्यात त्याचा माेठा वाटा अाहे. जावेद या स्पर्धांसाठी एखाद्याची स्पाेर्टस चेअर घेऊन या टुर्नामेंटस खेळताे. त्याला अास अाहे त्याच्या स्वतःच्या खुर्चीची
घरची परिस्थीती बेताची असल्याने जावेदला स्पाेर्टस व्हिल चेअर खरेदी करणे शक्य नाही. ही स्पाेर्ट्स चेअर भारतात तयार हाेत नसल्याने तिला परदेशातून अाणावे लागते. तिची किंमत साधारण चार लाखांहून अधिक अाहे. जावेदची ही व्हिल चेअर घेण्याची एैपत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ताे मदतीच्या प्रतिक्षेत अाहे.