सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जवाब दो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:24+5:302021-01-04T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्त्री शिक्षणाचा ज्या ठिकाणी पाया रचला गेला तो भिडे वाडा आजही दुर्लक्षित राहतो, यासारखे ...

'Jawab Do' movement on the occasion of Savitribai Phule's birthday | सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जवाब दो’ आंदोलन

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जवाब दो’ आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्त्री शिक्षणाचा ज्या ठिकाणी पाया रचला गेला तो भिडे वाडा आजही दुर्लक्षित राहतो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. जिथे स्त्री साक्षरतेची आद्यक्रांती झाली त्याच वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे. पडक्या भिंती, मोडके खांब, जागोजागी पडलेले मातीचे ढिगारे, वाड्यात जाताही येणार नाही अशी बिकट वाट. ही वाड्याची दयनीय अवस्था झाली असताना राज्य सरकाराने गेली कित्येक वर्षे हा प्रश्न केवळ खेळवत ठेवला आहे. राज्य सरकाने येत्या काही दिवसात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या मागणीसाठी सुरू असलेला न्यायालयीन लढा लढणारे वकील ॲड. मंगेश ससाणे यांनी दिला.

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी (दि.३) युवा माळी संघ आणि ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने राज्य सरकार विरोधात भिडे वाडा येथे ‘जवाब दो’ आंदोलन केले. त्या वेळी ॲड. ससाणे बोलत होते. यावेळी युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत, वृषाली शिंदे उपस्थित होते.

ॲड. मंगेश ससाणे म्हणाले, सरकारला हा प्रश्न खरंच सोडवायचा आहे की नाही अशी शंका यावी असे आजवर आलेल्या सर्वच राज्य सरकारांचे वर्तन दिसून येते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे कारण देऊन जो तो हात झटकत आहे. पंरतु भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होत नाही, तोवर आमचा लढा सुरुच राहणार आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंचा जयघोष करून त्यांना अभिवादन केले.

Web Title: 'Jawab Do' movement on the occasion of Savitribai Phule's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.