‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:07 AM2023-05-19T09:07:36+5:302023-05-19T09:08:04+5:30

वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले....

Jayant Patal's challenge to the ruling party, 'take the elections early and bring salvation' | ‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

googlenewsNext

पुणे : तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीच वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री असताना तेच पूर्वीच्या रचनेला विरोध करत आहेत. महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावावा. आपले पाप आपल्याच पारड्यात पडेल याची भीती आहे. त्यामुळे वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शहर राष्ट्रवादीच्या २१ कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, दीपाली धुमाळ, अश्विनी कदम, मृणालिनी वाणी, नीलेश कदम आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘कर्नाटक विधानसभेचा निकाल पाहता आगामी महापालिका निवडणुका लवकर घेतील, याचे धाडस हे सरकार करणार नाही. दलबदल, पक्षबदल केलेल्यांचा तेथे पराभव झाला आहे. राज्यातही तीच स्थिती राहणार आहे. त्यांच्याकडील नेते कधी आपल्याकडे येतील, हेही त्यांना कळणार नाही.

दरम्यान, बूथ कमिटीचे महत्त्व सांगत पाटील यांनी तत्काळ बूथ कमिटीच्या नियुक्त्या पूर्ण करा. सर्व शाखांनी एकत्र बसून एक जूनपर्यंत बूथ अध्यक्ष नेमावेत. वॉर्डनिहाय बैठका घ्याव्यात. पक्षाला मानणाऱ्या नागरिकांकडून त्यांची मते जाणून घ्यावीत. देशातील प्रश्नांबाबत चर्चा करावी. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम वाॅर्डावाॅर्डांत राबवा, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

ज्या पक्षात चर्चा विनिमय होते, तो पक्ष वैचारिकदृष्ट्या भक्कम असतो, असेही पाटील म्हणाले. पुणे शहरात राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, अशी खात्री आहे. पालिकेत चांगला कारभार करायची भाजपला संधी देऊन झाली आहे. आता पुणेकर राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नार्वेकर आपले जावई :

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. ‘रिझनेबल’ मुदतीत हा निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष न्याय व्यवस्था धाब्यावर बसवतील, असे वाटत नाही. तसेच, नार्वेकर हे आपले जावई आहेत. त्यांनी आपल्याकडून लोकसभा, विधानसभा लढवली आहे. ते आपल्या सद्भावनांची दाखल घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Jayant Patal's challenge to the ruling party, 'take the elections early and bring salvation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.