Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

By श्रीकिशन काळे | Published: August 11, 2024 11:52 AM2024-08-11T11:52:12+5:302024-08-11T12:34:06+5:30

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत असून पुण्यातून सारसबागेतून फेरीला सुरुवात होणार

Jayat prepares for Jarange Patal's rally; Strict police presence, parking arrangements at 20 places | Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (दि.११) सारसबागेसमोरून शांतता रॅली निघणार आहे. ही रॅली सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कनला पोचेल. त्यामुळे या सर्व ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवला आहे.

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. शनिवारी (दि.१०) सोलापूर आणि सांगली येथे रॅली झाली. त्यानंतर आज (दि.११) ही फेरी पुण्यात दाखल होत आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत. तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारसबागेसमोर जमा होत आहेत.

शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी सूचना 

1) रस्त्यावरून जाताना आणि येताना शांततेने यायचे आहे.
2) कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या विरोधात घोषणा देऊ नयेत.
3) रॅलीमध्ये आपले वर्तन शब्द आणि आदर्श असावे.
 4) वाहने चालवताना काळजी घ्यावी. रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही याब‌द्दल दक्षता घ्यावी.
5) वाहने पार्किंगमध्ये लावून सारसबाग येथून रॅलीमध्ये चालत सामील व्हायचे आहे
6) रॅलीमध्ये कोणत्याही वाहनास परवानगी असणार नाही
7)  जरांगे पाटील यांच्या गाडीच्या पुढे संपूर्ण महिलांचा जमाव चालणार आहे आणि गाडीच्या पाठीमागे पुरुषांचा जमाव चालणार आहे.

शांतता रॅलीत येणाऱ्या वाहनास पार्किंग व्यवस्था 

1. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अरण्येश्वर कॅम्पसचे मैदान
2. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे शुक्रवार पेठ मामलेदार कचेरी समोरील लेनमधील मैदान
3. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ग्राउंड
4. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलचे रमणबाग शाळेचे  मैदान
5. AISSMS संस्थेचे RTO ऑफिस शेजारील ग्राउंड
6. फर्ग्युसन कॉलेज ग्राउंड
7. वीर नेताजी पालकर वि‌द्यालय शिवाजीनगर पोलीस लाईन
8. क्रीडा निकेतन दत्तवाडी
9. लालबहादूर शास्त्री प्राथमिक वि‌द्यालय रोकडोबा मंदिर शेजारी शिवाजीनगर
10. प्राथमिक विद्यालय महात्मा फुले पेठ
11. धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय नवी पेठ, शाळा क्रमांक 67 घोरपडे पेठ
12. स. गो. बर्वे विद्यालय रास्ता पेठ, शाळा क्रमांक 9 नाना पेठ
13. सरदार कान्होजी आंग्रे प्राथमिक विद्यालय शुक्रवार पेठ
14. संत रामदास प्राथमिक वि‌द्यालय वडारवाडी हेल्थ कॅम्प
15. हुतात्मा बाबू गेणू प्राथमिक विद्यालय बिबेवेवाडी
16. मनपा ग्राउंड प्राथमिक विद्यालय शेतकी वि‌द्यापीठ आवार
17. वि. स. खांडेकर प्राथमिक विद्यालय सहकार नगर
18. भिडे पुलाशेजारील नदीपात्र
19. मॉडर्न मुलांची शाळा शिवाजीनगर ग्राउंड
20.मॅाडर्न इंजिनिअरींग कॅालेजचे पार्किंग
इत्यादी ठिकाणे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच ज्या बांधवांना शक्य असेल त्यांनी मेट्रोचा आणि लोकलचा वापर करावा, असे आवाहन पुणे जिल्हा सर्व मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: Jayat prepares for Jarange Patal's rally; Strict police presence, parking arrangements at 20 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.