जेबी फार्माकडून हृदयविकारावरील औषध "अझमार्डा"च्या किंमतीत ५० टक्क्यांनी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 04:03 PM2023-01-10T16:03:22+5:302023-01-10T16:04:19+5:30

पुणे - भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औषधीनिर्माण कंपन्यांपैकी एक जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जेबी फार्मा), गंभीर हृद्पातावरील औषध ...

JB Pharma price cuts heart disease drug "Azmarda" by 50 percent | जेबी फार्माकडून हृदयविकारावरील औषध "अझमार्डा"च्या किंमतीत ५० टक्क्यांनी कपात

जेबी फार्माकडून हृदयविकारावरील औषध "अझमार्डा"च्या किंमतीत ५० टक्क्यांनी कपात

googlenewsNext

पुणे - भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औषधीनिर्माण कंपन्यांपैकी एक जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जेबी फार्मा), गंभीर हृद्पातावरील औषध "अझमार्डा"च्या किमतीत जवळपास ५० टक्क्यांची लक्षणीय घट जाहीर केली आहे. अझमार्डा, ज्यामध्ये सॅक्युबिट्रिल- व्हल्सार्टन® हे पेटंटप्राप्त रेणू आहे आणि भारतातील हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ८० लाख ते १.२० कोटी लोकांना ते उपचारासाठी सूचित केले गेले आहे. किमतीत कपात केल्यानंतर, अझमार्डा (सॅक्युबिट्रिल-व्हल्सार्टन®) ५० एमजी आता प्रति टॅबलेट ७८ रुपयांच्या तुलनेत प्रति टॅबलेट ३९.६० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. महाराष्ट्रातील उच्च रक्तदाबाचे एकूण प्रमाण 25 टक्के आहे, जे हृदयाच्या विफलतेच्या जोखीम घटकांपैकी एक प्रमुख घटक आहे. किमतीतील कपातीमुळे लोकांची उपचार क्षमता वाढेल, ज्यामुळे हृदयविकाराचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी सुलभ होईल.

या पावलाविषयी भाष्य करताना, जेबी फार्माच्या देशांतर्गत व्यवसायाचे अध्यक्ष दिलीप सिंग राठोड म्हणाले, “हृदयविकार विभागातील एक आघाडीचा औषधनिर्माता असल्याने, जेबीने भारतात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आपले अझमार्डा हे औषध अधिक सुलभ आणि परवडणारे बनवण्यात पुढाकार घेण्याचे ठरविले. रुग्णांना नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपचार सर्वात वाजवी दरात प्रदान करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगतच हे पाऊल आहे. यामुळे रुग्णांचा एकूण मासिक उपचार खर्च ४,५०० रुपयांवरून २,२०० रुपयांपर्यंत लक्षणीयरीत्या कमी होईल. हृद्पातासाठी रुग्णालयात दाखल झालेल्यांचा एकूण उपचारावरील खर्च किमान १,००,००० रुपयांना कमी करण्यास देखील यातून मदत होईल. विक्री किमतीत कपात केलेले औषध डिसेंबर २०२२ पासून ग्राहकांसाठी सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

हृदयक्रिया बंद पडणे अर्थात हार्ट फेल्युअर ही एक गंभीर स्थिती आहे ज्यात हृदय पाहिजे तसा रक्त पुरवठा करण्याच्या स्थितीत राहत नाही. हे एक क्रमवर्धी चिरकालिक लक्षण आहे ज्यायोगे रग्णाची सामान्य कार्यशील स्थिती आणि जीवनाची गुणवत्ता कमी होत जाते. फुफ्फुसात द्रव जमा होण्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि गुडघ्यापासून खाली पायापर्यंत सूज येऊ शकते. असा अंदाज आहे की देशातील ८० लाख ते सव्वा कोटी लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. अनेकदा यापैकी अनेक लोकांकडून त्यांच्या आजाराचे निदानच होत नाही आणि रुग्णांना त्याची जाणीव मुख्यतः शेवटच्या टप्प्यावर होते.

देशातील हृद्पाताच्या गंभीरतेवर बोलताना, एमएमएफ जोशी हॉस्पिटल, पुणे येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. नितीन पत्की म्हणाले, “जगातील २.६० कोटी हृदयविकाराच्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण भारतात आहेत; तथापि, या स्थितीबद्दल जागरूकता कमी आहे. जीवनशैलीतील आजार जसे की उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे हृदयाच्या विफलतेसाठी महत्वाचे जोखीम घटक आहेत. गुंतागुंत निर्माण झाल्याशिवाय रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत म्हणून, त्यांचे निदान होत नाही आणि मग उपचारही केले जात नाहीत आणि शेवटी खूप उशीरा हृदयाच्या विफलतेसह रुग्ण उपचारासाठी पुढे येतात. भारतीयांमध्ये विशेषतः जीवनशैलीतील आजारांना बळी पडणे, तसेच औषधांविषयक पथ्यांचे पालन न करणे ही हृदयविकाराची काही प्रमुख कारणे आहेत. परिस्थितीचे गांभीर्य यावरून समजू शकते की भारतातील सुमारे ५० टक्के हृदयविकाराचे रुग्ण विविध कारणांमुळे निर्धारित औषधे घेत नाहीत. जागरुकता पसरवण्यासोबतच, लवकर निदान, लवकर उपचार सुरू करणे आणि औषधांच्या वेळांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला खूप काही काम करणे आवश्यक आहे.”

"हृद्पात ही एक विनाशकारी स्थिती आहे आणि या स्थितीबद्दल जागरूकता वाढवणे महत्वाचे आहे. त्या संदर्भात, आम्ही महाराष्ट्रात ३०+ आणि देशभरात ३००+ 'हृदय निकामी' क्लिनिक देखील स्थापित करीत आहोत, जेणेकरून रुग्णांना ही वैद्यकीय स्थिती लवकर ओळखता येईल आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक निर्णय घेता येतील,” असे श्री. राठोड पुढे बोलताना स्पष्ट केले.

हृदयविकार रूग्णांना पारंपारिकपणे मुख्य औषध म्हणून फक्त एआरबी (Angiotensin receptor blockers) / एआय (Ace Inhibitors) लिहून दिले जात होते. २०१७ मध्ये दाखल झालेले सॅक्युबिट्रिल+ व्हल्सार्टन, ईएफ (इजेक्शन फ्रॅक्शन) हे एआरबी/ एआय पेक्षा श्रेष्ठ मानले जाते. रुग्णांसाठी अत्यंत प्रभावीही ठरले आहे. सॅक्युबिट्रिल+ व्हल्सार्टन सध्या ३० ते ३५ टक्के HFrEF रूग्णांना लिहून दिले जाते, तर डॉक्टरांचा असा विश्वास आहे की योग्य किंमतीसह या औषधाचा वाटा येत्या काळात ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
 

Web Title: JB Pharma price cuts heart disease drug "Azmarda" by 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.