जितेंद्र आव्हाडांचा बोलावता धनी दुसरा कोणतरी असू शकतो- अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:19 PM2024-01-17T14:19:05+5:302024-01-17T14:30:05+5:30
हात जोडून माझी विनंती आहे,अशी वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करू नये
पुणे : प्रभू श्रीराम यांच्याबाबत आव्हाडांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानावर राजकीय नेते, विरोधक तसेच अनेक धार्मिक संस्थानकडून टीका होऊ लागली आहे. मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. असे आव्हाड यांनी सांगितले आहे. यावरच आता अब्दुल सत्तार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
जितेंद्र आव्हाडांचा बोलावता धनी दुसरा कोणतरी असू शकतो असं ते म्हणाले आहेत. तसेच आव्हाड याचा निषेध करतो, हात जोडून माझी विनंती आहे,अशी वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
काय म्हणाले होते आव्हाड
“राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.
मी विधानावर ठाम
मी माझ्या विधानावर ठाम असून कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, याचा आव्हाड यांनी पुनरुच्चार केला होता.