जीवप्रभा ट्रस्टकडून रुग्णालय व पोलिसांना सुरक्षा साहित्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:42+5:302021-05-22T04:09:42+5:30
याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मेडिकल अधीक्षक डॉ. तावरे, कोविड इनचार्ज डॉ. प्रो. हरिष टाटिया तसेच ट्रस्टचे विश्वस्त सुचेता ...
याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मेडिकल अधीक्षक डॉ. तावरे, कोविड इनचार्ज डॉ. प्रो. हरिष टाटिया तसेच ट्रस्टचे विश्वस्त सुचेता शहा, मनोज गांधी, चकोर गांधी व सुरेंद्र गांधी उपस्थित होते.
तसेच कोविड योद्धे म्हणजेच पोलीस दल यांच्या सुरक्षिततेसाठी यांना मदतीचा व माणुसकीचा हात देण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमधील १६० पोलीस योध्दयांना मास्क, १६० फेसशिल्ड, १६० सॅनिटायझर बॉटल्स असे साहित्य परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त पंकजजी देशमुख व उपअधीक्षक खडकी विभागाचे रमेश गलांडे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे व जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. जीवप्रभा चॅरिटेबल या ट्रस्टमार्फत मुलींचे वसतिगृह चालवण्यात येते. या ट्रस्टतर्फे समाजातील गरजूंना शैक्षणिक शिष्यवृत्ती, वैद्यकीय आर्थिक मदत, अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य व युनिफॉर्म स्वरूपात मदत देण्यात येते.