जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 03:33 PM2023-06-04T15:33:33+5:302023-06-04T15:33:46+5:30

बाहेरगावच्या विश्वस्तांची निवड केल्याने जेजुरीत आज दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच

Jejuri Board of Trustees Selection Process Raj Thackeray promises to hold talks with Deputy Chief Minister Devendra Fadnavis | जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

googlenewsNext

जेजुरी: जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेत आपण हस्तक्षेप करू शकत नाही मात्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जेजुरीकरांना दिले आहे. तीर्थक्षेत्र जेजुरी खंडोबा देव संस्थानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कमिटी मध्ये जेजुरीतील स्थानिकांना डावलून बाहेर गावच्या विश्वस्तांची निवड केल्याने जेजुरीत आज दहाव्या दिवशी ही उपोषण सुरूच आहे.

आज सकाळी ११.३० वाजता आंदोलक माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, मनसे चे तालुका अध्यक्ष उमेश जगताप,  नगरसेवक अजिंक्य जगताप, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर, कृष्णा कुदळे, निलेश जगताप आदिंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिव तीर्थ  निवासस्थानी भेट घेऊन खंडोबा देवाचे प्रतीक म्हणून घोंगडी आणि भंडार कोटमा देऊन सत्कार केला.  आंदोलनाबाबत माहिती दिली.  मागण्यांचे निवेदन ही ठाकरे यांना देण्यात आले.

चर्चेत राज ठाकरे यांनी झालेल्या निवडी ह्या न्यायप्रविष्ठ बाब असल्याने त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मात्र राज्याचे न्यायविधी मंत्री खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलून घेतो. सद्याचे विश्वस्त मंडळ सात जणांचे आहे. यात घटना दुरुस्ती करून सात ऐवजी ११ जणांचे करण्याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Jejuri Board of Trustees Selection Process Raj Thackeray promises to hold talks with Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.