जेऊर येथे वाळू चोरट्यांवर जेजुरी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:36+5:302021-08-01T04:10:36+5:30
जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेऊर आणि पिसुरटी या गावांच्या मधील खंडोबाचा माळ जवळ असणाऱ्या ओढ्यात विना परवाना ...
जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेऊर आणि पिसुरटी या गावांच्या मधील खंडोबाचा माळ जवळ असणाऱ्या ओढ्यात विना परवाना वाळू उपसा केला जात असल्याची पोलिसांना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खबर मिळाली होती. त्यानुसार ताबडतोब जेजुरी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत वाळू चोरी करसणारे निलेश पोपट पवार ( वय ३७ वर्षे रा. वाल्हे. ) आणि दिलीप निवृत्ती येळे (रा. पारवडी, ता. शिरूर ) या दोघांना अटक केली आहे. तसेच वाळू उपसा करण्यासाठी आणलेले नंबर नसलेले दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर तसेच कार ( क्र. एम एच १२ आर टी ५११७ ) असा एकूण २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास उपनिरीक्षक कैलास गोतपागर हे करीत आहेत.
जेऊर वाळू उपसा प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली वाहने