हेरिटेज दर्जा कायम ठेवून जेजुरीगडाचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:09+5:302021-07-17T04:09:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ३४९ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व ...

Jejurigad will be developed while maintaining heritage status | हेरिटेज दर्जा कायम ठेवून जेजुरीगडाचा विकास करणार

हेरिटेज दर्जा कायम ठेवून जेजुरीगडाचा विकास करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ३४९ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली. हेरिटेज दर्जा कायम ठेवून जेजुरी गडाचा विकास करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या टप्प्यांतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पवार यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार यांनी सांगितले, जेजुरी गडाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हे जागृत देवस्थान असून इथे राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जेजुरीच्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून विकासाचे नियोजन करा. विकासकामे करताना कमीत कमी वेळेत काम पूर्ण होईल याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. विश्वस्त आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सर्व विभागांनी विकासाची कामे करावीत. मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिरामध्ये बदल न होऊ देता जुन्या पद्धतीचा दृष्टिकोन समोर ठेवून विकास कामे करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

-----

रसायनमिश्रित भंडाऱ्याची विक्री करणाऱ्यावर कारवाई

गडावर उधळली जाणारी हळद रसायनमिश्रित असल्याने सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे. रसायनमिश्रित भंडाऱ्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांबाबत कठोर करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

Web Title: Jejurigad will be developed while maintaining heritage status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.